चौकशी होईपर्यंत मी मंत्रिपदापासून दूर राहायला हवे ही माझी भूमिका. संजय राठोड
मुंबई, २८ प्रतिनिधी:-
पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेनेचे आमदार आणि विद्यमान वनमंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले गेल्यानंतर आज दुसऱ्यादा ते प्रसारमाध्यमांमोर आले. मुंबईतील वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते आपले म्हणणे मांडत होते.
दरम्यान, यासंदर्भात संजय राठोड यांनी देखील भाष्य केलं आहे. मी माझा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. विरोधी पक्षानं अतिशय घाणेरडं राजकारण केलं. मीडियाच्या माध्यमातून बदनामी करण्याचा प्रयत्न केला. माझ्या समाजाची बदनामी केली गेली.निष्पक्षपणे चौकशी व्हावी अशीच माझी मागणी. मुख्यमंत्र्यांकडे मी अशीच मागणी केली आहे. मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, आमदारकीचा नाही. ज्या पद्धतीनं राजकारण केलं केलं, ते लोकशाहीच्याविरोधात आहे, हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा अपमान आहे. अधिवेशन बंद पाडण्याची भाषा अपमानजनक, कोणत्याही प्रकरणाची चौकशी आधी व्हायला पाहिजे असं संजय राठोड म्हणाले.
तसेच पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी, याच कारणामुळे मी मंत्रिपदापासून बाजूला होत आहे, असे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितल्याचे संजय राठोड म्हणाले. मी मुख्यमंत्र्यांकडे मंत्रिपदाचा राजीनामा देत असताना माझ्या सोबत अनिल परब आणि अनिल देसाई उपस्थित होते, असेही राठोड म्हणाले. चौकशी होईपर्यंत मी मंत्रिपदापासून दूर राहायला हवे ही माझी भूमिका असल्याचे ते म्हणाले.
