Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रपंडित दीनदयाळ विद्यालयात शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात साजरी.- मतदान कक्षाचे उद्घाटन पत्रकार...

पंडित दीनदयाळ विद्यालयात शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात साजरी.- मतदान कक्षाचे उद्घाटन पत्रकार संघाचे अध्यक्ष बशीर मुल्ला यांच्या हस्ते.

पंडित दीनदयाळ विद्यालयात शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात साजरी.- मतदान कक्षाचे उद्घाटन पत्रकार संघाचे अध्यक्ष बशीर मुल्ला यांच्या हस्ते.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथे (शनिवार) रोजी पंडित दीनदयाळ विद्यालय मध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात पार पडली. भारताचा राज्यकारभार संविधानानुसार चालतो .या संविधानानुसार दर पाच वर्षांनी भारतामध्ये सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जातात.त्यानुसार प्रतिनिधी निवडून देशाचा राज्यकारभार चालतो .त्याच पद्धतीने विद्यालयामध्येही विद्यार्थ्यांना ही मतदान प्रक्रिया समजण्यासाठी विद्यालयाने मंत्रिमंडळ निवडणूकीची प्रक्रिया घेतली.मोबाईलद्वारे मतदान घेण्यात आले. मतदान कक्षाचे उद्घाटन बशीर मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आले.संस्थेचे खजानिस रमेश कारेकर, प्राचार्य संजीव देसाई यावेळी उपस्थित होते.
प्रत्यक्ष मतदान केंद्र तयार करून केंद्राध्यक्ष , अधिकारी,एआय च्या माध्यमातून मोबाईल द्वारे ईव्हीएम मशीनद्वारे विद्यार्थ्यांनी मतदान करून आपला मतदानाचा अधिकार बजावला. विद्यार्थ्यांनी खूप उत्साहाने यामध्ये सहभाग घेऊन शालेय मंत्रिमंडळ निवडून दिले.
मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच इतर मंत्रिमंडळ यांची निवड करण्यात आली.मतदान कक्षाला संवेदना फाउंडेशनचे सचिव संतराम केसरकर, संजय हरेर यांनी सदिच्छा भेट दिली. तेजश्री बुरुड, विद्या कुंभार यांनी शिक्षकांच्या मदतीने या कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमासाठी विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी,विद्यार्थिनी उपस्थित होते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.