Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रदुःखद घटना.- आजरा येथे १३ वर्षीय मुलीचा गळफासाने मृत्यू; आकस्मिक मृत्यूची नोंद.

दुःखद घटना.- आजरा येथे १३ वर्षीय मुलीचा गळफासाने मृत्यू; आकस्मिक मृत्यूची नोंद.

आजरा येथे १३ वर्षीय मुलीचा गळफासाने मृत्यू; आकस्मिक मृत्यूची नोंद.

आजरा, प्रतिनिधी.

आजरा शहरातील नाईक गल्ली येथे १३ वर्षीय मुलीचा घरात गळफास लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी आजरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची हकीकत मयत मुलगी कु. आफिया जाबीर शेख, वय १३, रा. नाईक गल्ली, आजरा हिचा दि. २९ रोजी रात्री ८.०० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात मृत्यू झाला.

फिर्यादी जाबीर महमदरसुल शेख, वय ३१, व्यवसाय गवंडी काम, यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी घरातील खोलीत खेळत असताना तिच्या गळ्याभोवती ओढणीचा फास लागून ही घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच आजरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मयत मुलीचे वडील जाबीर शेख यांनी दिलेल्या वर्दीवरून घटनेची नोंद केली आहे. सपोनि यांच्या आदेशाने पुढील तपास पो. हे. कॉ. ६५५ शिकालगार हे करीत आहेत. दाखल अंमलदार पो. हे. कॉ. ७९१ मकानदार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना अपघाती आहे का याचा अधिक तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.