वड म्हणजे केवळ एक वृक्ष नाही, तर तो गावाचा एक मोठा आधारस्तंभ.- श्रमदानातून साकारला कोवाडेत “ज्येष्ठ नागरिक संवाद कट्टा.”
आजरा.- प्रतिनिधी.
कोवाडे ता. आजरा येथील वडाच्या झाडाला ‘पारा’ (संवाद कट्टा) नागरिकांच्या मदतीने तयार केला आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये वडाच्या झाडाला अत्यंत पवित्र मानले जाते. वड म्हणजे केवळ एक वृक्ष नाही, तर तो आपल्या गावाचा एक मोठा आधारस्तंभ व जीवनदायी सावली आहे.
याच उद्देशाने वडाच्या वृक्षाचा ‘पारा’ (संवाद कट्टा) बांधण्याच्या कार्याचा शुभारंभ १४ जून रोजी झाला.
आज दि. २९ रोजी महिलांना वटपौर्णिमासाठी तसेच गावातील सर्वांना बसण्या उठण्यासाठी खुला करण्यात आला. गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या गावातून अशी मागणी येत होती की, गावातील महिलांना वटपौर्णिमेचा सण साजरा करण्यासाठी तसेच गावात ज्येष्ठ नागरिकांना संध्याकाळी एकत्र बसण्यासाठी, सुख-दुःखाच्या गोष्टी करण्यासाठी हवेशीर आणि निवांत जागा असावी. या उद्देशाने हा पारा बांधण्याचा उपक्रम भास्कर देसाई व शिवाजी विठोबा जगदाळे (दोघेही माजी सैनिक) या नागरिकांच्या आर्थिक योगदानातून असून तसेच गावातील ईश्वर होरटे, कुमार चिमणे, गणपती हुंदळेकर, बाबू चिमणे, कृष्णा भुइंगडे, विवेकानंद देसाई, रवींद्र कांबळे, रवींद्र नावलगी, थळू कांबळे, आनंदा कांबळे, रोहन जांभळे, यांच्या श्रमदानातून साकार झाला आहे.
वृक्षाचे रक्षण करणे आणि पर्यावरणाचा समतोल राखणे, हा देखील या उपक्रमाचा एक मुख्य हेतू आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन विकास बागडी, सुरेखा देसाई, विजय जांभळे, संतोष चिमणे, बाळू शिवगण, आनंदा देसाई, मारुती देसाई, राऊ खवरे, नारायण पोवार, सतिश देवेकर, अमर नार्वेकर, दत्तात्रय देसाई, रवींद्र देसाई, संजय तांबेकर, शंकर मांगले, आशा देसाई, निर्मला शेलार, अनिता गुंजकर तसेच आजी – माझी सैनिक आणि सर्व गावकऱ्यांचे हस्ते झाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार सचिन बराटे यांनी केले आणि या कामासाठी सदिच्छा दिल्या.
