आजरा. प्रतिनिधी. ३०.
शेतकऱ्यांना कृषी साहित्य माफक दरात उपलब्ध करुन देणार
आजरा जि. प. कोळींद्रे मतदार संघातील ताराराणी आघाडीच्या सदस्या सुनिता रेडेकर यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. कोळींद्रे मतदारसंघातील गरजू शेतकऱ्यांसाठी माफक दरात कृषी साहित्य उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले असून यासाठी कृषी साहित्य निर्मिती करणाऱ्या कंपनीशी चर्चा करून माफक दरात साहित्य उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे यासाठी सदर कंपनीने ही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल मी त्या कंपनीचे आभारी आहे सदर योजना ही दिनांक १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर या कालावधीसाठी उपलब्ध असून यामध्ये इलेक्ट्रिक मोटार, कडबा कुट्टी यंत्र, बॅटरी स्प्रे पंप, ताडपत्री, सायकल कोळपा, शेती संच, नारळ सोलणी यंत्र, खुरपे या कृषी साहित्यांचा समावेश आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी होईल इतका पडणारा पाऊस यामध्ये पिकाचे होणारे नुकसान दुसरीकडे वन्य प्राण्याप्राण्याकडुन होणारे पिकाचे नुकसान व शासनाची मिळणारी अल्प रक्कम यामुळे शेतकऱ्यांना सदर कृषी साहित्य घेण्यास आर्थिक अडचण निर्माण होत आहे. म्हणून माफक दरात सदर कृषी साहित्य देण्याची योजना असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. तरी गरजू शेतकऱ्यांनी तसेच आजरा शहरातील कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जि. प. सदस्या सौ रेडेकर यांनी केले आहे.
