Homeकोंकण - ठाणेअखेर दाभिल रेशन धान्य दुकानासाठी जाहीरनामा प्रसिद्ध - मुक्ती संघर्ष समितीच्या लढयाला...

अखेर दाभिल रेशन धान्य दुकानासाठी जाहीरनामा प्रसिद्ध – मुक्ती संघर्ष समितीच्या लढयाला यश.- परवाना रद्द.

दाभिल गावात आनंदाचे वातावरण.

आजरा. प्रतिनिधी. २९.

आजरा तालुक्यातील मौजे दाभिल येथील रेशन दुकानदार यांचे दोन्ही परवाने रद्द झाले होते. दोन्ही परवाने रद्द करुन सदर ठिकाणी नव्याने परवाना दोन महिन्यात मंजूर करण्याचे आदेश – मंत्री महोदय यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिले होते. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी जाहीरनामा काढलेला आहे. मौजे दाभिल , ता . आजरा , जि . कोल्हापूर येथील रेशन दुकानदार सौ . जयश्री विठोबा यादव , यांचे सरकारमान्य स्वस्त धान्य दुकान नं . ३३/०१ व केरोसिन ( रॉकेल ) परवाना क्र . २० ९ / २०१४ या मौजे दाभिल , ता . आजरा , जि . कोल्हापूर यांचे हे दोन्ही परवाने मंत्रालयातुन रद्द करणेची लढाई मुक्ती संघर्ष समितीने यशस्वीरित्या पूर्ण केलेली होती .तरीही गेली चार वर्षे दाभिल रेशन धान्य दुकान गवसे येथील तालुका संघाच्या शाखेला जोडले होते. रेशन धान्य आणण्यासाठी दाभिल ग्रामस्थांना १२ किलोमीटरवर पायपीट करावी लागत होती.अखेर दुकान परवान्यासाठी जाहीरनामा निघाल्याने मुक्ती संघर्ष समितीच्या आणि दाभिल ग्रामस्थांच्या लढ्याला यश आले आहे.

दुकानदार यांनी शासनाची , प्रशासनाची व मौजे दाभिल येथील जनतेची भ्रष्टाचार करुन फसवणूक केलेली होती . या संदर्भात अनेकवेळा मंत्रालयाल व जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या प्रशासनाला वेळोवेळी ठोस पुरावे दिलेले होते . यासाठी मौजे दाभिल , ता . आजरा येथील ९५ % ग्रामस्थानी अनेक दिवस ” मुक्ती संघर्ष समिती ‘ या संघटनेच्या नेतृत्वाखाली दिनांक २/१२/२०१४ पासून तहसिल कार्यालय , आजरा , जि . कोल्हापूर येथे ‘८५ दिवस ‘ बेमुदत ठिय्या आंदोलन वरील दोन्ही परवाने रद्द होणेसाठी लढा दिलेला होता . त्या आंदोलना अगोदरही तहसिल कार्यालय आजरा यांच्या कार्यालयावर अनेकवेळा मोर्चे काढणेत आलेले होते . यामध्ये मौजे दाभिल येथील ९५ % लोक रेशनदुकानदाराच्या विरोधात होते . याची गांभिर्यपुर्वक दखल मंत्रालयाला ही घ्यावी लागलेली होती . त्यामुळेच अशा भ्रष्ट व फसवणूक करणाऱ्या रेशनदुकानदाराचेही दोन्ही परवाने रद्द करणेची लढाई मंत्रालय पातळीवर मुक्ती संघर्ष समितीने यशस्वीरित्या जिंकलेली होती . हा रेशनदुकानदार ‘ शासन निर्णय क्र . साविष्य १० ९ १ / २४२४ / प्र ६१७८ / ना.पु .२८ मंत्रालय विस्तार , मुंबई ४०० ०३२ दिनांक १२ नोव्हेंबर १ ९९१ च्या शासन निर्णयानुसार गंभीर दोषामध्ये सापडलेला आहे . त्यांनी केलेले गुन्हे हे गंभीर स्वरुपाचे होते. हे आम्ही मौजे दाभिल , ता . आजरा , जि . कोल्हापूर येथील २५ रेशनकार्ड धारक ( शिधापत्रिका धारक ) यांचे पुस्तकरुपी पुरावे प्रशासनाला कॅशबुकच्या झेरॉक्स सहीत दिलेले होते . सर्वात महत्वाचे म्हणजे रेशनकार्ड धारक ‘ सु.म. नेवरेकर ‘ हे रेशन कार्डधारक ( शिधापत्रिका धारक ) दाभिल गावातील रहिवाशी नसताना रेशन दुकानदाराच्या कॅशमेमोत सु.म.नेवरेकर या व्यक्तीच्या नावाच्या पावत्या नोंदविलेल्या होत्या . सदर व्यक्ती दाभिल या गावची रहिवाशी नसले बद्दल मा . सरपंच व ग्रामसेवक , ग्रामपंचायत दाभिल , ता . आजरा , जि . कोल्हापूर यांचा दाखला प्रशासनाकडे दाखल केलेला होता . या सर्व पुराव्यांच्या आधारे मा . उपविभागीय अधिकारीसो , आजरा भुदरगड विभाग , गारगोटी , जि . कोल्हापूर यांनी मौजे दाभिल , ता . आजरा येथे प्रत्यक्ष भेट देऊन वरील पुराव्यांची छाननी करुन मा . जिल्हा पुरवठा अधिकारीसो , पुरवठा विभाग , जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांचेकडे सादर केलेला होता . त्या अहवालाच्या आधारेच मा . जिल्हा पुरवठा अधिकारीसो , पुरवठा विभाग जिल्हाधिकारी कार्यालय , कोल्हापूर यांनी दुकानदारांचे दोन्ही परवाने रद्द केले होते . मंत्री महोदय यांनी , पुर्वी आपल्या न्यायालयासमोर दिनांक २५/११/२०१५ इ . रोजी मा . सौ . जयश्री विठोबा यादव , रेशनदुकानदार , रा . दाभिल , ता . आजरा , जि . कोल्हापूर यांच्या पुर्नरिक्षण अर्जावर पुणे येथे सुनावणी झाली आहे . या सुनावणीत मंत्री महोदय यांनी रेशन दुकानदाराच्या बाजुने निर्णय व आदेश दिला आहे . मात्र या रेशन दुकानदाराने गंभीर चुका केलेल्या आहेत . मुक्ती संघर्ष समितीच्यावतीने त्या लेखी स्वरुपात उघडकीस आणून दिलेल्या होत्या . मा . उपविभागीय अधिकारीसो , ( प्रांताधिकारी ) आजरा – भुदरगड विभाग गारगोटी , जि . कोल्हापूर यांनी शासनाच्या व प्रशासनाच्या वतीने आम्ही दिलेल्या पुराव्यांच्या आधारे प्रत्यक्ष गावामध्ये येऊन ( दि . १४/१/२०१५ चा अहवाल ) आपला ठोस अहवाल तयार करुन मा . जिल्हा पुरवठा अधिकारीसो , पुरवठा विभाग , जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांना लेखी स्वरुपात सादर केला होता , त्याच्या आधारेच मा , जिल्हा पुरवठा अधिकारीसो . पुरवठा विधाण , जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर आणि मा . उपायुक्तसो ( पुरवठा विभाग ) पुणे विभाग पुणे यांनी पुराव्याच्या आधारेच जनतेच्या बाजुने व वस्तुस्थिती आणि सत्याच्या बाजुने निकाल दिला होता . त्यांचे दोन्ही परवाने रद्द करण्यात आले होते . मात्र मंत्री महोदय , आपण सौ . जयश्री विठोबा यादव , रेशनदुकानदार , रा . दाभिल , ता . आजरा.या रेशनदुकानदाराने गंभीर चुका करूनही आपण दुकानदारास दोन्ही परवाने पुर्ववत सुरु करण्याचे आदेश दिले होते . याच्या विरोधात मुक्ती संघर्ष समितीच्यावतीने पुन्हा आंदोलन करणेत आले . तसेच पुर्ननिरीक्षणासाठी अर्ज मंत्री महोदय अन्न नागरी पुरठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई येथे दाखल करणेत आला . त्याच्यावर सुनावणी होऊन मंत्रीमहोदयांनी जनतेच्या न्यायीक बाजुने निर्णय देऊन जनतेला न्याय दिलेला होता. . मंत्री महोदयांनी पुन्हा पुर्नरिक्षण व पुर्नावलोकन करुन जनतेच्या बाजुने व न्यायीक बाजुने आपला निर्णय दिलेला होता. अखेर रेशनदुकानदाराच्या अरेरावीपणामुळे आणि भ्रष्टाचार व फसवणूक करण्याच्या प्रवृत्तीलाच जबर बसविणेचे काम मुक्ती संघर्ष समितीच्यावतीने करणेत आले आहे.
जानेवारी , २०१४ मध्ये दामिल ग्रामस्थांनी रेशन धान्य दुकानावर बहिष्कार टाकण्याचा सामुदायिक निर्णय घेतला होता . गेली ७ वर्षे रेशनसाठी ग्रामस्थांचा लढा सुरू होता . अखेर २१ ऑगस्ट २०२१ रोजी शासनाकडून दाभिल रेशन धान्य दुकानासाठी जाहीरनामा निघाला आहे . दाभिल ग्रामस्थांनी जानेवारी २०१४ मध्ये एकजुटीने रेशन धान्य दुकानावर बहिष्कार टाकला होता . त्यानंतर गेली सात वर्षे याविरोधात संघर्ष सुरू होता . जुलै २०१४ मध्ये दाभिल ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून मुक्ती संघर्ष समितीच्या माध्यमातून लढा उभारला . यावेळी सहा महिन्यांच्या कालावधीनंतर तालुका संघाच्या माध्यमातून गावातच रेशन देण्याचा आदेश तहसीलदारांनी दिला . यानंतर २ डिसेंबर २०१४ मध्ये ग्रामस्थांनी तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला होता . तब्बल ८५ दिवसांचे ऐतिहासिक आंदोलन छेडण्यात आले होते . आजरा तालुक्याच्या , इतिहासातील इतके विक्रमी दिवस सुरू असलेले हे एकमेव आंदोलन ठरले . त्यावेळच्या आंदोलनाचा परिणाम म्हणून गावामध्ये विशेष सभा आयोजित करून तत्कालीन दुकानदाराकडे असलेला रेशन परवाना रद्द करण्याचा ठराव करण्यात आला होता . यामध्ये तहसिलदारांनी एका महिन्यात दुकानाचा अहवाल देण्याचा आदेश दिला होता . फेब्रुवारी २०१५ मध्ये पुन्हा ठिय्या आंदोलन करूनही
शासनाने दखल न घेतल्याने ४ दिवस आमरण उपोषण करण्यात आले होते . यानंतर ८५ दिवसांच्या आंदोलनानंतर रेशन धान्य दुकानाचे अनामत जप्त करून परवाना रद्द करण्यात आल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते . गावातील रेशनधान्य दुकानाचा परवाना रद्द झाल्यानंतर गेल्या चार वर्षापासून ग्रामस्थांना रेशनधान्य देण्याची सुविधा करण्यात आली होती . गावात दुकान सुरू करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली होती . त्या अनुषंगाने आता दुकानासाठी जाहीरनामा प्रसिद्ध झाल्याने गावात दुकान सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. असे दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात राज्याध्यक्ष संग्राम सावंत -मुक्ती संघर्षसमिती यांनी म्हटले.आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.