Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा चिमणेत ७५ हून अधिक जणांना विषबाधा ( सेवानिवृत्त शिक्षकांचा स्नेह भोजनाचा...

आजरा चिमणेत ७५ हून अधिक जणांना विषबाधा ( सेवानिवृत्त शिक्षकांचा स्नेह भोजनाचा कार्यक्रम)

आजरा चिमणेत ७५ हून अधिक जणांना विषबाधा ( सेवानिवृत्त शिक्षकांचा स्नेह भोजनाचा कार्यक्रम)

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील चिमणे गावातील एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या सेवानिवृत्ती समारंभात केलेल्या शाकाहारी जेवणातून सुमारे ७५ हून अधिक जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली. बाधितांमध्ये लहान मुले, महिला, पुरुष व वृद्धांचा समावेश असल्याचा समजते.

 (शुक्रवारी दि. १२ रोजी ) सायंकाळी सेवानिवृत्त शिक्षकांचा कार्यक्रम झाला. जेवनानंतर अनेकांना मळमळ, उलट्या, पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. त्रास सुरु झाल्याने नागरिकांना तातडीने चिमणे आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर अनेकांना उत्तूर प्राथमिक आरोग्य केंद्र,उपजिल्हा रुग्णालयात व खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता परिस्थिती नियंत्रणात असून बहुतांश रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. चिमणे येथे वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.