Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रजनता सहकारी गृहकारण संस्थेमार्फत प्राचार्य डॉक्टर अशोक सादळे यांना शुभेच्छा.

जनता सहकारी गृहकारण संस्थेमार्फत प्राचार्य डॉक्टर अशोक सादळे यांना शुभेच्छा.

जनता सहकारी गृहकारण संस्थेमार्फत प्राचार्य डॉक्टर अशोक सादळे यांना शुभेच्छा.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून उल्लेखनीय सेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्त झालेले प्रोफेसर (डॉ अशोक सादळे यांचा नुकताच जनता गृहतारण मार्फत शुभेच्छा व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हाइस चेअरमन अशोक बाचुळकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक करून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर डॉ. अशोक सादळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय मनोगतात चेअरमन मारूती मोरे यानी डॉ. सादळे यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाची शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात झालेली प्रगती विशेषत्वाने अधोरेखित केली
यावेळी बोलताना डॉ. सादळे यांनी आपल्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत सहकारी, विद्यार्थी, व्यवस्थापन आणि समाजातील सर्व घटकांचे सहकार्य लाभल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या एकूण कारकिर्दीत जनता सहकारी गृहतारणचे मोलाचे योगदान असल्याचे सांगितले. या संस्थेशी आपले नाते पुढेही कायम राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज शेटके यांनी केले तर आभार प्रदर्शन रवींद्र आजगेकर यांनी मानले. उपस्थितांनी डॉ. अशोक सादळे यांना निरोगी, आनंदी व यशस्वी निवृत्त जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी संचालक प्रो. (डॉ.) तानाजी कावळे, प्रो. (डॉ.) संजीवनी पाटील; प्रा. क्रांती शिवणे, प्रा. नेहा पेडणेकर, दिनकर पोटे, कृष्णा डेळेकर, मॅनेजर मधुकर खवरे, प्रशासकीय अधिकारी मारुती कुंभार, शाखाधिकारी अरविंद कुंभार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.