Homeकोंकण - ठाणेगिरणी कामगराना- हक्काची घरे मिळावी. - सर्व श्रमिक संघाचे. आम. आबिटकरांना निवेदन.

गिरणी कामगराना- हक्काची घरे मिळावी. – सर्व श्रमिक संघाचे. आम. आबिटकरांना निवेदन.

आजरा. प्रतिनिधी. २९.

आजरा येथील सर्व श्रमिक संघ यांच्या वतीने आजरा – राधानगरी – भुदरगड विधानसभेचे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांना गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळाले पाहिजे आशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे कि गिरणी कामगारांच्या घरांसाठीचा प्रश्न लवकर मार्गी लागावा. तसेच गिरणी कामगारांच्या व वारसाच्या यादीतील दुबार व तिहार नोंदी रद्द करुन अंतिम लाभार्थी यादी लवकरच तयार व्हावी व गिरणी कामगार व वारसांना घरपात्रतेचा दाखला दिला जावा मुंबई येथेच गिरणीच्या जागेत घरे मिळावी. उर्वरित गिरणी कामगार व वारसांना घरे मिळण्यासाठी मुंबई मधील नागरी कमाल जमीनी धारणा कायद्याखाली सरकारने ताब्यात घेतलेल्या जमीनी पैकी आवश्यक अशी ३०० एकर जमीन द्यावी. व या जागेवर गिरणी कामगार व वारस यांचे आरक्षण नमुद व्हावे. गिरणी मालकांना कर बसवून घराच्या बांधकामासाठी पैसा उपलब्ध करावा व त्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी गिरणी कामगारांच्या वतीने करण्यात आले.
( आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुंबई येथे गिरणी कामगारांच्या प्रश्नाबाबत आपण पुढील दिशेने वाटचाल कशी करता येईल यासाठी प्रयत्न सुरू करू असे आश्वासन दिले.)
यावेळी आजरा सर्व श्रमिक संघटनेचे कॉ. शांताराम पाटील, दौलत राणे, नारायण राणे, शांताराम हरेर, नारायण भडांगे, निवृत्ती मिसाळ, पद्मिनी पिळणकर, तसेच राधानगरी भुदरगड तालुक्याचे गिरणी कामगार अध्यक्ष कृष्णा चौगुले बाबुराव थोरवत बाजीराव चौगुले बाजीराव तोरस्कर इत्यादी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.