Homeकोंकण - ठाणेजन आशीर्वाद यात्राजिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी राजापूरचे भाजपाचे तालुका अध्यक्ष अभिजीत...

जन आशीर्वाद यात्रा
जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी राजापूरचे भाजपाचे तालुका अध्यक्ष अभिजीत गुरव,प्रमोद जठार यांच्यासह १९ भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यां विरुध्द गुन्हा दाखल.

सिंधुदुर्ग. प्रतिनिधी.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा कार्यक्रमाची कोणतीही परवानगी न घेता जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरक्षित अंतर न पाळता विनापरवाना लाऊड स्पीकर व वाद्य लावून फटाके फोडल्याप्रकरणी राजापूर भाजप तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव ,प्रमोद जठार यांच्यासह अन्य भाजप कार्यकर्त्यांवर राजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये रवींद्र नागरेकर ,विलास पेडणेकर, मोहन घुमे ,दीपक बेंद्रे , जब्बार काझी, विवेक गुरव, अरविंद लांजेकर, संदेश आंबेरकर ,अमर वारीशे, गोविंद चव्हाण, नागेश शेटे, समीर खानविलकर, राजा काजवे, संतोष गांगण, भरत बेनकर,(साउंड डेकोरेटर्स ) संकेत बावकर, प्रफुल्ल पिसे, आदि एकोणीस भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.