Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रबागेश्वर बाबावर कठोर कारवाई करा - अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी.( पुण्यश्लोक...

बागेश्वर बाबावर कठोर कारवाई करा – अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी.( पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी समर्थ रामदास स्वामी यांची भेट झाल्याचे कोणतेही सबळ पुरावे नाहीत.)🟣आजरा शिवसेनेच्या वतीने “गाय” दिन साजरा. ( जागतिक गाय दिन – World Cow Day )

🟣बागेश्वर बाबावर कठोर कारवाई करा – अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी.
( पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी समर्थ रामदास स्वामी यांची भेट झाल्याचे कोणतेही सबळ पुरावे नाहीत.)
🟣आजरा शिवसेनेच्या वतीने “गाय” दिन साजरा. ( जागतिक गाय दिन – World Cow Day )

🛑बागेश्वर बाबावर कठोर कारवाई करा – अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी.

आजरा.- प्रतिनिधी.

अखिल भारतीय मराठा महासंघ आजरा यांची सभा सोमवार दि. २७/०४/२०२६ घेणेत आजरा येथे घेणेत आली.
या सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि राष्ट्रपुरष आहेत त्यांचा इतिहास अत्यंत दैदिप्यमान असून तो पुराव्यांवर आधारीत आहे. नुकतेच धीरेंद्र कृष्ण शास्त्री ज्यांना बागेश्वर बाबा म्हणून ओळाखले जाते यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात / व्हिडीओमध्ये असे वक्तव्य केले आहे की, समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते. ऐतिहासिक पुराव्यांनुसार आणि आधुनिक संशोधनानुसार, छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची भेट झाल्याचे कोणतेही सबळ पुराव नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकिय गुरु राजमाता जिजाऊ माँ साहेब होत्या. राजांचे स्वराज्य निर्माण करणे हेच ध्येय होते. जाणीवपूर्व चुकीचा इतिहास सांगून जनसामान्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न व त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवप्रेमींच्या आणि तमाम महाराष्ट्र वासियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत तसेच धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या वादग्रस्त वक्त्यांमुळे वारंवार चर्चेत असतात त्यांनी केवळ छत्रपती शिवाजी महाराजच नव्हे, तर इतर अनेक धार्मिक आणि सामाजिक विषयांवर अशी विधाने केली आहेत ज्यावरुन मोठे वाद निर्माण झाले आहेत. आम्ही आजरा तालुका अखिल भारतीय मराठा महासंघ त्यांचा “जाहिर निषेध करत आहोत.” असे वक्तव्य करुन हिंदू समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत कोणताही ऐतिहासिक पुरावा दाखवावा आणि मगच अशी वक्तव्य करावीत जाणिव पूर्वक चुकीचा इतिहास समाजामध्ये पसरवून सामाजिक सलोखा बिघडवून व आमच्या देवताचा घोर अपमान केला आहे. महापुरुषांचा इतिहास चुकीच्या पध्दतीने मांडणे हे सामाजिक सलोखा बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकते त्याबददल भारतीय दंड सहितेच्या (IPC) संबधित कलमांनुसार कायदेशीर गुन्हा दाखल करावा आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी अखिल भारतीय मराठा महासंघ कठोर कारवाई करावी हि मागणी केली आहे. या बैठकीला जिल्हाध्यक्ष मारूती मोरे, जि. उपाध्यक्ष सी. आर. देसाई, तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण, ता.उपाध्यक्ष शंकरराव शिंदे तसेच शिवाजी पाटील सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🟣आजरा शिवसेनेच्या वतीने “गाय” दिन साजरा. ( जागतिक गाय दिन – World Cow Day )

आजरा.- प्रतिनिधी

गाय दिन म्हणजे गायीचे महत्व, संरक्षण आणि संवर्धनासाठी साजरा केला जाणारा दिवस. हा दिवस आजरा शिवसेना उबाठा वतीने साजरा करत गाईचे महत्व पटवून दिले भारतात आणि जगभरात वेगवेगळ्या तारखांना जागतिक गाय दिन साजरा होतो. या दिवसाचा उद्देश उद्देश – गायीचे पर्यावरण, शेती आणि मानवी जीवनातील महत्व पटवून देणे. गोसंवर्धन, देशी गायींचे संरक्षण यावर भर. महत्त्व म्हणजे हिंदू धर्मात या दिवशी श्रीकृष्णाने गायी चारायला सुरुवात केली. गायींची पूजा करून गवत, गूळ खायला देतात. हा पारंपरिक भारतीय गाय दिनच आहे.
खऱ्या अर्थाने गाय दिनाचे महत्व शेतीसाठी: शेणखत, गोमूत्र हे उत्तम सेंद्रिय खत. नांगरणीसाठी बैल. तसेच आरोग्यासाठी देशी गायीचे दूध, तूप, दही औषधी. पंचगव्य आयुर्वेदात महत्वाचे.
पर्यावरण शेणापासून बायोगॅस, जमिनीची सुपीकता वाढते.
आर्थिक दुग्धव्यवसाय लाखो कुटुंबांचा आधार, गाय दिन कसा साजरा करत गायींना चारा, गूळ, हिरवे गवत खायला देणे, देशी गायींच्या संवर्धनासाठी जनजागृती, गोमूत्र, शेणापासून बनणाऱ्या वस्तूंचा वापर वाढवणे याबाबतची माहिती महिलांनी दिली. महिलांच्या हस्ते गायची, ओवाळणी पूजा करण्यात आली. यावेळी सौ. अनुसया पाटील, सुनिता मिसाळ, तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी,उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, ता.प्रमुख युवराज पोवार, महेश पाटील सह युवा सेना शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.