Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रप्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी अंतर्गत सर्व उपकेंद्रांमध्ये जागतिक हिवताप दिन उत्साहात साजरा.

प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी अंतर्गत सर्व उपकेंद्रांमध्ये जागतिक हिवताप दिन उत्साहात साजरा.

प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी अंतर्गत सर्व उपकेंद्रांमध्ये जागतिक हिवताप दिन उत्साहात साजरा.

आजरा.- प्रतिनिधी २५.

प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी अंतर्गत सर्व उपकेंद्रांमध्ये जागतिक हिवताप दिन उत्साहपूर्ण व जनजागृतीपर वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त गावोगावी जनजागृती रॅली, स्वच्छता अभियान, प्रबोधन सभा तसेच हिवताप प्रतिबंधक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन कार्यक्रम शनिवार दि २५ रोजी आयोजित करण्यात आले होते.

हिवताप (मलेरिया) हा संक्रमित Anopheles मादी डासांच्या चाव्यामुळे पसरणारा संसर्गजन्य आजार असून ताप, थंडी वाजणे, घाम येणे, डोकेदुखी, अशक्तपणा व अंगदुखी ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत. वेळेवर निदान व उपचार घेतल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. नागरिकांना घर व परिसर स्वच्छ ठेवणे, साचलेले पाणी त्वरित नष्ट करणे, मच्छरदाणीचा नियमित वापर करणे तसेच ताप, थंडी वाजणे किंवा अशक्तपणा जाणवल्यास तात्काळ आरोग्य केंद्रात तपासणी करून उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले.
तसेच हिवताप प्रतिबंधासाठी गावपातळीवर कंटेनर तपासणी मोहीम राबविण्यात आली. घरांच्या परिसरातील टाक्या, ड्रम, कुलर, टायर, नारळाच्या करवंट्या, फुलदाणी व इतर पाणी साचणाऱ्या वस्तूंची तपासणी करून डासांची उत्पत्ती रोखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. काही ठिकाणी डासांच्या अळीनियंत्रणासाठी गप्पी मासे सोडण्यात आले.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. जी. गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख,आरोग्य निरीक्षक अतुल पाथरवट, आरोग्य सहाय्यक जे. एच. साबखान तसेच आरोग्य सेवक युनुस सय्यद, दर्शन भालेराव, दीपक हरणे, लक्ष्मण घोरपडे, शिवम तरोळे, प्रमोद कांबळे व रोहित शेंडे यांनी प्रत्यक्ष गावपातळीवर जाऊन जनतेमध्ये हिवतापाबाबत जागरूकता निर्माण केली.
कार्यक्रमात आशा स्वयंसेविका, स्थानिक नागरिक व युवक मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सामूहिक सहभागातून हिवतापमुक्त गाव, निरोगी समाज आणि स्वच्छ परिसराचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. सदर उपक्रमामुळे नागरिकांमध्ये हिवताप प्रतिबंधाबाबत सकारात्मक जनजागृती निर्माण झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.