नागपूर. प्रतिनिधी-
महिला; दलित; वृद्ध आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी समाजकार्य कसे करावे याचे प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याची माझी भुमीका होती.त्यामुळे महाराष्ट्र सरकार मध्ये समाज कल्याण मंत्री असताना मी राज्यात सर्वप्रथम समाजकार्य विद्यालयांची निर्मिती केली असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.नागपूर मधील ऑरेंज सिटी समाजकार्य विद्यालयात आयोजित सत्कारसमारंभात ना. रामदास आठवले प्रमुख म्हणून बोलत होते. यावेळी ऑरेंज सिटी समाज कार्य विद्यालयाचे चेयरमन चंदनसिंग रोटेले; रिपाइं चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भुपेश थुलकर; सौ किरण रोटेले; केदारसिंग रोटेले; काजल रोटेले;आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राध्यापक ट्रेनिंग सेन्टर एम एस इ टी चे सेंटर ऑरेंज सिटी कॉलेज मध्ये सुरू करण्याची मान्यता युजीसी ( विद्यापीठ अनुदान आयोगा ) कडून मिळाली असून त्या m-set सेन्टर चे ना रामदास आठवले यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी कॉलेज च्या आवारात ना रामदास आठवले यांच्या हस्ते बोधीवृक्षाचे रोपण करण्यात आले. कॉलेज च्या ग्रंथालयास ना रामदास आठवले यांनी भेट दिली.
ऑरेंजसीटी कॉलेज च्या प्राध्यापिका डॉ शुभांगी लुंगे यांनी लिहिलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अभंगांचे भावसौंदर्य आणि डॉ आंबेडकर थॉट्स या ग्रंथांचे प्रकाशन यावेळी ना रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. दलित पँथर चळवळीत दिवंगत ज्येष्ठ कार्यकर्ते लेखक कवी पत्रकार बबन लाव्हात्रे यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांच्या शोकाकुल कुटुंबाला रिपाइं तर्फे 1 लाख रुपये देण्याची घोषणा ना रामदास आठवले यांनी केली होती त्यानुसार ऑरेंजसीटी कोलेजतर्फे दिवंगत बबन लव्हात्रे कुटुंबाला 50 हजाराची मदत यावेळी देण्यात आली.
