Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रशक्तीपीठ महामार्गाला सर्व शक्तीनिशी विरोध करू.१५ एप्रिलला बाधित शेतकऱ्यांचा मेळावा..( मा. खास....

शक्तीपीठ महामार्गाला सर्व शक्तीनिशी विरोध करू.१५ एप्रिलला बाधित शेतकऱ्यांचा मेळावा..( मा. खास. राजू शेट्टी, डॉ भारत पाटणकर, आम. सतेज उर्फ बंटी पाटील यांना निमंत्रित करणार.)

शक्तीपीठ महामार्गाला सर्व शक्तीनिशी विरोध करू.
१५ एप्रिलला बाधित शेतकऱ्यांचा मेळावा..( मा. खास. राजू शेट्टी, डॉ भारत पाटणकर, आम. सतेज उर्फ बंटी पाटील यांना निमंत्रित करणार.)

आजरा – प्रतिनिधी.

शक्तिपीठ महामार्गाला पूर्ण शक्तीनिशी विरोध करण्याचा निर्धार आज शेतकऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला. पंधरा तारखेला आजरा येथे व्यापक मेळावा घेऊन शेतकऱ्यांचा विरोध दाखवून देऊ असा निर्धार आज आजरा येथे झालेल्या बैठकीत करण्यात आला. सुरुवातीला शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक कॉम्रेड संपत देसाई म्हणाले शक्तिपीठ महामार्गाची गरज नसताना सरकार शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या वर लादत आहे. या महामार्गामुळे शेतकऱ्यांची जमीन आणि इथले समृद्ध पर्यावरण उध्वस्त होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला आम्ही संघटितपणे विरोध करून शक्तिपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही.

शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई म्हणाले हा महामार्ग केवळ अदानीचे हित डोळ्यासमोर ठेवून सरकार जबरदस्तीने बांधण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारचा हा प्रयत्न तालुक्यातील जनता उधळून लावल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी आनंदराव कुंभार म्हणाले आधीच वन्यप्राणी आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे त्यात भरीस भर म्हणून हे सरकार मार्फत नवे संकट शेतकऱ्यांच्या वर येत आहे. आम्ही हे संकट परतवून लावू.

यावेळी माजी उपसभापती निवृत्ती कांबळे, युवराज जाधव, धनाजी सावंत, शंकर पाटील, बाळू दोरुगडे, श्रीपती गुरव, प्रकाश दोरुगुडे, बाळू जाधव, जानू लाड, मारुती पाटील, कृष्णा सावंत यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते
हरपवडे, कोरिवडे, पेरणोली, देवर्डे, वेळवटी, पेठेवाडी, मसोली, पोळगाव, एरंडोल, सातेवाडी या महामार्गाने बाधित होणाऱ्या बाधित होणारे होणाऱ्या गावातील शेतकरी उपस्थित होते. पंधरा तारखेला आजरा येथे व्यापक मेळावा घेऊन शेतकऱ्यांचा विरोध दाखवून देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. मेळाव्याच्या तयारीसाठी गाववार बैठकांचे नियोजन करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.