Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रजनता बँकेला रु ९ कोटी ९१ लाखाचा ढोबळ नफा व रु ४७५...

जनता बँकेला रु ९ कोटी ९१ लाखाचा ढोबळ नफा व रु ४७५ कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण.

जनता बँकेला रु ९ कोटी ९१ लाखाचा ढोबळ नफा व रु ४७५ कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण.

आजरा.- प्रतिनिधी

जनता सहकारी बँक लि आजरा या बँकेला सन २०२५-२०२६ साली रु ९ कोटी ९१ लाखाचा करपुर्व ढोबळ नफा झाला असून बँकेने रु ४७५ कोटीचा टप्पा पूर्ण करत बँकेच्या मार्च २०२६ अखेर एकूण ठेवी रु ४७६ कोटी १० लाख, कर्ज रु २९२ कोटी ३६ लाख व गुंतवणुक रु २२५ कोटी ५५ लाख इतकी असून बँकेचा सीडी रेशो ६१.४७ इतका आहे. बँकेचा एन पी ए शुन्य टक्के, सी आर ए आर १५.२१ टक्के व बँकेचा एकूण व्यवसाय रु ७६८ कोटी ७६ लाख इतका आहे. बँकेने या वर्षात रु ४७५ कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण करणेचा संकल्प केला होता. त्याला उदंड प्रतिसाद देत सभासद, ठेवीदार व हितचिंतक यांनी बँकेबद्दल असलेला विश्वास व आत्मीयता सार्थ ठरविली आहे. बँकेचे कार्यक्षेत्र कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, ठाणे, मुंबई व उपनगरे या जिल्हयात असून बँकेच्या एकूण २१ शाखा कार्यरत आहेत. बँकेने सर्व प्रकारची अद्यावत टेक्नॉलोजी अमलात आणुन सर्व अद्यावत डिजीटल सेवा ग्राहकांना देणेत यशस्वी ठरली आहे. बँकेने आजपर्यंत जे जे ठरविले आहे ते ते सर्व वेळेत पूर्ण केलेले आहे. त्यासाठी बँकेला लाभलेले कुशल नेतृत्व श्री देसाई व उच्च विद्याविभुशीत अनुभवी सीईओ एम बी पाटील यांचे पारदर्शी कारभारामुळे बँकेने वेगवेगळया यशाचे टप्पे पूर्ण करत बँकेची घोडदौड सतत उंचावत ठेवली आहे. आजऱ्यासारख्या ग्रामीण भागामध्ये इंटरनेट व लिज लाईनच्या खंडीत सेवेमुळे बँकेने बँकेचे डाटा सेंटर नव्याने कोल्हापूर येथे उभा केलेले आहे.
हे सर्व करत असताना बँकेने सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक व कर्मचारी यांना सर्व सुविधा देणेत समतोल राखला असून कर्मचाऱ्यांना यावर्षी २० टक्के बोनस व रजेच्या पगाराची तरतुद केली आहे. नुकतेच रिझर्व बँकेने कल्याण शाखेला मंजुरी दिली असून येणाऱ्या आर्थिक वर्षात अल्पावधीतच नवीन शाखा सुरु करुन ग्राहकांच्या सेवेत हजर होत असलेबाबतचे बँकेचे चेअरमन मुकुंददादा देसाई यांनी व्यक्त केले. या यशामध्ये बँकेचे सर्व कर्मचारी व बँकेचे सर्व ग्राहक यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये रु ५५० कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण करणेचा मानस बँकेचे चेअरमन श्री.‌देसाई व सीईओ एम बी पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी बँकेचे व्हा चेअरमन अमित सामंत, सह संचालक महादेव टोपले, रणजित देसाई, जयवंत शिंपी, बाबाजी नाईक, शिवाजी पाटील, विक्रमसिंह देसाई, जयवंत कोडक, संतोष पाटील, पांडुरंग तोरगले, महेश कांबळे, सौ रेखा देसाई, सौ नंदा केसरकर, संभाजी अस्वले – सीए व अॅड शंकर निकम, तसेच बँकेचे अधिकारी पी ए सरंबळे, एस एच चौगुले, एम वाय सावंत, एन जी कुंभार आय टी मॅनेजर एस बी पाटील उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.