वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याची 15 जानेवारी अखेरची – ऊस बिले.
आजरा.- प्रतिनिधी.

वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे सन 2025-26 या हंगामात 105 दिवसात 306880.606 मे. टन ऊसाचे गाळप झाले असुन 363225 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. कारखान्याकडे दि.01.01.2026 ते 15. 01.2026 अखेर गाळप झालेल्या 42371.880 मे.टन ऊसाच्या बिलाची प्रतिटन रू. 3400/- प्रमाणे विनाकपात होणारी रू.14 कोटी 40 लाख इतकी रक्कम ऊस पुरवठादार शेतक-यांच्या सेव्हींग खात्यावर जमा करण्यात आली असलेबाबतची माहिती कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव देसाई यांनी दिली.
सन 2025-26 या संपलेल्या गळीत हंगामामध्ये कारखान्याने ठेवलेले गाळपाचे उदिष्ठ पुर्ण करणे अति पावसामुळे ऊसाच्या उत्पन्नात व साखर उता-यात झालेली घट त्याचबरोबर यावर्षी परभागातील अपुरी आलेली तोडणी यंत्रणा यामुळे शक्य झाले नाही. तरी देखील व्यवस्थापनाने 3 लाख 7 हजारापर्यंत गाळप केलेले आहे. त्याचप्रमाणे तालुक्याच्या पश्चिम भागातील अति पावसामुळे निकृष्ट प्रतिचा ऊस परिणामी कारखान्याने जादा खर्च करून गळीतास आणुन शेतक-यांची अडचण दुर केली आहे.
कारखान्याचे संचालक मंडळाने येता सन 2026-27 चा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सक्षम तोडणी-वाहतुक यंत्रणा उभारणेसाठी गुढी पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर तोडणी वहातुकीचे करार करणेचे काम सुरू सुरू करणार आहे. पुढील हंगामासाठी ऊस नोंदी व कराराचे कामही सुरू करीत आहोत. ज्या शेतक-यांनी अद्याप ऊसाचे करार केले नाहीत. त्यांनी संबंधीत शेती ऑफिसशी संपर्क साधून आपले करार करावेत. त्याच बरोबर आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुक्यातील आजरा कारखान्याकडे काम करू इच्छिणा-या उस तोडणी वाहतुक कंत्राटदारांनी आपल्या वाहनांचे मजुरांचे तोडणी वाहतुकीचे करार मुदतीत करावेत असे आवाहन मा. चेअरमन श्री. देसाई यांनी केले
