एक वर्षात शहिद ऋषिकेशच्या स्वप्नातील घर पूर्ण करण्याचे वचन अखेर पुर्ण.
आजरा. प्रतिनिधी. २६
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा बहिरेवाडी येथील ऋषिकेश जोंधळे हा जवान पाकिस्तान सीमेवर लढताना जम्मू काश्मीरमध्ये वर्षभरापूर्वी धारतीर्थी पडला. भाऊबीजेच्या दिवशीच त्यांचे पार्थिव पाहण्याची दुर्दैवी वेळ आले होते. शहीद ऋषिकेश यांच्या घरी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशध्यक्ष माजी मंत्री. चंद्रकांत पाटील यांनी शहीद ऋषिकेशचे घर बांधण्याचे स्वप्न अपूर्ण असल्याचे लक्षात आल्यानंतर एक वर्षात आपण ऋषिकेशच्या स्वप्नातील घर पूर्ण करण्याचे वचन भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री पाटील यांनी दिले होते. त्या घराचे बांधकाम पूर्ण झाले असून हे घर ऋषिकेशचे वडील आणि त्यांच्या कुटुंबाकडे सुपुत्र करण्याचा कार्यक्रम शनिवार दि. २८ रोजी होणार आहे. हा कार्यक्रम भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री पाटील यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती भाजपचे जिल्हा संघटक मंत्री नाथाजी पाटील यांनी उत्तुर ता. आजरा येथील पत्रकार परिषदेत दिली या कार्यक्रमासाठी भाजपचे प्रदेशउपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी खासदार धनंजय महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक चराटी, तसेच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्यासह आजरा गडहिंग्लज तालुक्यातील माजी सैनिक, बहिरेवाडी ग्रामस्थ, उत्तुर पंचक्रोशीतील गावाचे सरपंच, संस्था पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी व शहीद जवान ऋषिकेश यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजप आजरा तालुका अध्यक्ष सुधीर कुंभार यांनी याप्रसंगी केले.
यावेळी आजरा तालुका भाजप सरचिटणीस अतिशकुमार देसाई, संघटक सरचिटणीस श्रीपती यादव, तालुका उपाध्यक्ष शैलेश मुळीक, युवा मोर्चा अध्यक्ष संतोष बेलवाडे, उत्तुर शहराध्यक्ष प्रदीप लोकरे, उपाध्यक्ष भास्कर भाईगडे, प्रवीण लोकरे, संजय धुरे, धोंडीराम सावंत, बाळासाहेब सावंत, संगम रावण मंदार हळवणकर, सुनील गोरुले, सतीश पन्हाळकर, स्वागत परुळेकर, अभिजीत मोरे, अशोक कोणकीरे, इत्यादी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. श्री देसाई यांनी आभार मानले