Homeकोंकण - ठाणेमहापालिका निवडणुकांची तयारी सुरु; बहुसदस्यीय प्रभाग पद्धती ऐवजी एक सदस्यीय प्रभाग

महापालिका निवडणुकांची तयारी सुरु; बहुसदस्यीय प्रभाग पद्धती ऐवजी एक सदस्यीय प्रभाग

मुंबई – प्रतिनिधी.

महापालिका निवडणुकांसाठी बहुसदस्यीय प्रभाग असणार की एकस सदस्य असणार यावरून गेले काही महिने चर्चा सुरू होती. अखेर याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय जाहीर केला असून आगामी महापालिका निवडणुकीसाठी एक सदस्यीय प्रभाग पद्धती असणार आहे हे स्पष्ट झाले आहे. महापालिका सार्वत्रिक निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धती ऐवजी एक सदस्यीय प्रभाग पद्धती नुसार होणार असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. यापूर्वी काही महापालिकांमध्ये प्रत्येक प्रभागात किमान ३ सदस्य होते.

आगामी महापालिकेच्या निवडणुका सध्या अस्तित्वात असलेल्या प्रभाग रचनेनुसार होणार की वॉर्डप्रमाणे याबाबत अनेक दिवस अनिश्चितता होता. ऐन वेळेवर शासन याबाबत निर्णय घेऊ शकते, असे राजकीय पक्षांचे मत होते. दरम्यान, शहराचा विस्तार वाढल्याने सीमालगतचा भाग शहरात समाविष्ट केल्यास वॉर्डाची संख्या वाढू शकते, असे झाल्यास नव्याने वॉर्ड किंवा प्रभाग रचना केली जाऊ शकते, असाही मतप्रवाह होता. मात्र आता राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका या एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार असे आदेश दिले आहेत.

विद्यमान महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ फेब्रुवारीपर्यंत असल्याने त्यानंतर निवडणुका अपेक्षित आहे. सध्या प्रभाग रचना अस्तिवात आहे. तीन वॉर्डाचा एक प्रभाग आहे. ही पद्धत बदलवून वॉर्ड रचनेनुसार निवडणुका घ्याव्या, असा प्रयत्न महाविकास आघाडीचा होता. मात्र आता निवडणूक आयोगाकडून राज्यातील १८ महापालिकेच्या निवडणूकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचा आदेश दिले आहेत.

दरम्यान, पुणे, पिंपरी चिंचवड, बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.