सह्याद्री प्रतिनिधी
● दक्षिण कोकणसह घाट परिसरात जोरदार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीदरम्यान चक्रीय वाऱ्याची स्थिती
● मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज्यातील अधिकाऱ्यांना मोठा दिलासा; गट अ आणि गट ब मधील अधिकाऱ्यांच्या बाबतीत देखील हे अनुकंपा धोरण लागू होणार
● काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सोलापूर दौऱ्या दरम्यान काँग्रेसचे पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर धावून आले; काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
● राज्य सरकारचा मोठा निर्णय! शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचाही होणार समावेश; विद्यार्थ्यांना मिळणार शेतीचं ज्ञान
● दौंडच्या कानगांवात महावितरणच्या विरोधात शेतकऱ्यांचे बोंबाबोंब आंदोलन; ऊर्जामंत्र्यांचा पुतळा जाळला
● पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरचे रुप पालटणार; विठ्ठल मंदिराला ७०० वर्षापूर्वीचे रूप मिळणार; पुरातत्व विभागाच्या वतीने आराखडा तयार
● सांगलीत भाजपचं पालकमंत्री हटाव आंदोलन; उद्धव ठाकरेंनी पालकमंत्री पद स्वीकारण्याची मागणी
● कोव्हिडनंतर रोजीरोटीचा फार मोठा प्रश्न, त्याला तोंड देऊ शकलो नाही तर मोठे संकट निर्माण होईल: मुख्यमंत्री
● कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्यासंदर्भात NTAGI सोबत सविस्तर चर्चा केली जाईल; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
● तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता गुप्तचर संस्थांनी जम्मू-काश्मीरमध्ये अफगाणिस्तानातून ड्रग्जची तस्करी वाढण्याचा इशारा