Homeकोंकण - ठाणेगिरणी कामगारांचा संयुक्त लढा १० मार्चला आझाद मैदानावर धडकणार.- कॉम्रेड उदय भट.(...

गिरणी कामगारांचा संयुक्त लढा १० मार्चला आझाद मैदानावर धडकणार.- कॉम्रेड उदय भट.( आजऱ्यात गिरणी कामगारांचा मेळावा संपन्न.)

गिरणी कामगारांचा संयुक्त लढा १० मार्चला आझाद मैदानावर धडकणार.- कॉम्रेड उदय भट.
( आजऱ्यात गिरणी कामगारांचा मेळावा संपन्न.)

आजरा.- प्रतिनिधी.

मुंबईत घरे नाकारणारे १५ मार्च २०२४ शासन निर्णयामधील कलम १७ रद्द करण्यात आपण यश मिळवले गिरणी कामगारांना मुंबईतुन हद्दपार करून वांगणी / शेलूला पाठवणारे १७ नंबर कलम आपल्या चळवळीमुळे रद्द झाले आता मुंबईतच गिरणी कामगारांना घरे मिळविण्याच्या आपल्या पुढील आंदोलनाची घोषणा आता परत मुंबईला – आपला हक्क सांगायला मोठ्या संख्येने आझाद मैदानावर धडकणार असल्याचे आजरा येथील गिरणी कामगारांच्या मेळाव्यात अध्यक्ष स्थानावरून कॉम्रेड उदय भट बोलत होते.
स्वागत व प्रास्ताविक कॉम्रेड नारायण भडांगे यांनी केले
पुढे बोलताना कॉम्रेड श्री भट म्हणाले गिरणी कामगार हा महाराष्ट्राचा कणा आहे. सरकारचे धोरण बदलले यामुळे गिरणी कामगारांचा संघर्ष वाढला गिरणीच्या जमिनी मिळून देखील. सरकारकडे पैसा शिल्लक राहिला गिरणी कामगाराकडे दुर्लक्ष झाले यामुळे लोकशाहीच्या मागणीसाठी गिरणी कामगारांचा संघर्ष उभा राहिला ग्रामीण भागातील खेडे गावापासून विधानसभेपर्यंत आंदोलन छेडले रस्त्यावर उतरले यामुळे गिरणी कामगारांना घर मिळणार या शब्दाला वाचा फुटली महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीची हक्काची जमीन उद्योग करायला दिली होती. ती खाजगी मालकाकडे कशी गेली सरकारने एक गोष्ट लक्षात ठेवावी गिरणी कामगार हा इतिहासाच्या पानावरून नष्ट होणार नाही. सरकारच्या रोजच्या वेगवेगळ्या आश्वासनांवर जोरदार टीका यावेळी केली.
पुढील लढ्यासाठी १० मार्चला होणाऱ्या आझाद मैदान वरील लढ्यासाठी पुन्हा गिरणी कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी श्री कॉम्रेड भट यांनी केले.
यावेळी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अतुल दिघे म्हणाले. गिरणी कामगारांनी चुकीचा कायदा व कायद्याचा कनोटा मोडला आहे. या सरकारने पात्र केलेल्या गिरणी कामगारांची प्रथम घरी कुठे बनणार हे प्रथम सांगावे. हे सरकार जनावरांचं संरक्षण करतं जनावरापासून माणसाचं होणार किंवा शेताचे होणारे नुकसानाचे संरक्षण करत नाही. या सरकारला शेतकऱ्यांची शेती संपवून महामार्ग तयार करायचे आहेत शक्तिपीठ महामार्ग हा कोणासाठी आहे. हे दलालांचे प्रमुख अंबानी आहेत. त्यांच्यासोबत दलांची सत्ता आहे. मागणी नसताना हे सिमेंटचे रस्ते कशासाठी व कोणासाठी काय चाललंय या राज्यामध्ये व देशामध्ये आता ए. आय. तंत्रज्ञान येत आहे. अनेक तरुणांना तंत्रज्ञान असले तरी याचा फटका नोकरीत बसणार आहे. गिरणी कामगार संघटना आता फक्त गिरणी कामगारांचा प्रश्न न घेता आता गिरणी कामगार हा शेतकरी आहे. होता. या शेतकऱ्यांसाठी “शेतकरी परिषद” घेणार आहे. देशातील शेतकऱ्यांचे मोठे नेते व राज्यातील शेतकरी संघटनेचे नेते या परिषदेसाठी प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत. आता हा लढा शेतकऱ्यांसाठी देखील असेल परंतु दहा मार्चला होणाऱ्या आझाद मैदानावरील आंदोलनात आजरा तालुक्यातील गिरणी कामगार सह वारसदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे चे आवाहन केले. यावेळी कॉम्रेड दत्तात्रय आत्याळकर, धोंडीबा कुंभार, शिवाजी सावंत, शांताराम पाटील यांनी गिरणी कामगार व वारसादार यांच्या मेळाव्यात मनोगत व्यक्त केले.
या गिरणी कामगारांच्या मेळाव्याला विठ्ठल बामणे, हिंदुराव कांबळे, नारायण राणे, महादेव होडगे, आनंदा सुतार दत्तात्रय देसाई गोपाळ होलम जानबा तेजम निवृत्ती मिसाळ, अनिता बागवे राजश्री कुंभार सुरेखा बागवे कोरुबाई शिंदे बायाका शिंदे दौलती राणे सह गिरणी कामगार संघटनेचे सर्व तालुक्यातील पदाधिकारी गिरणी कामगार वारसदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कॉम्रेड काशिनाथ मोरे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.