Homeकोंकण - ठाणेकृषक भारती को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (कृभको) च्या राज्यप्रमुखपदी जितेंद्र भामरे यांची पदोन्नती (...

कृषक भारती को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (कृभको) च्या राज्यप्रमुखपदी जितेंद्र भामरे यांची पदोन्नती ( सहकार तत्त्वावर चालणारी देशातील अग्रगण्य संस्था.)

कृषक भारती को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (कृभको) च्या राज्यप्रमुखपदी जितेंद्र भामरे यांची पदोन्नती ( सहकार तत्त्वावर चालणारी देशातील अग्रगण्य संस्था.)

कोल्हापूर.- प्रतिनिधी

कृषक भारती को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (कृभको) या राष्ट्रीय पातळीवरील सहकारी संस्थेच्या महाराष्ट्र राज्यप्रमुखपदी जितेंद्र टी. भामरे यांची पदोन्नती करण्यात आली आहे. श्री. भामरे हे १९९६ पासून कृभकोमध्ये कार्यरत असून त्यांनी आपल्या कारकिर्दीत विविध जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. जळगाव येथे त्यांनी जिल्हा विपणन अधिकारी म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. क्षेत्र अधिकारी पदापासून सुरुवात करून विभागीय व्यवस्थापक पदापर्यंत विविध जिल्ह्यांत त्यांनी प्रभावी नेतृत्व केले आहे.

कृषक भारती को-ऑपरेटिव्ह लिमिटेड ही सहकार तत्त्वावर चालणारी देशातील अग्रगण्य संस्था असून विविध राज्यांमध्ये रासायनिक खते व बी-बियाणे पुरवठा करण्याचे कार्य करते. संस्थेच्या प्रगतीत श्री. भामरे यांचे योगदान मोलाचे ठरले आहे.

जितेंद्र भामरे हे तुकाराम भामरे (रा. मालपुर, ता. साक्री, जि. धुळे) यांचे जेष्ठ चिरंजीव आहेत. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण नूतन माध्यमिक विद्यालय, छडवेल कोरडे येथे झाले असून बारावीपर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, साक्री येथे पूर्ण झाले. त्यांनी कृषी महाविद्यालय, पुणे येथून पदवी शिक्षण घेतले असून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक येथून एमबीए पदवी संपादन केली आहे.

संस्थेप्रती असलेली प्रामाणिकता, उत्कृष्ट कार्यक्षमता आणि सहकार विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सर्वांना सोबत घेऊन काम करण्याच्या त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांची राज्यप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.