Homeकोंकण - ठाणेखुशखबर.- आजरा समृद्धी प्रोड्युसर कंपनीचा. सभासद रक्कम ५०० पासून . ११० रु...

खुशखबर.- आजरा समृद्धी प्रोड्युसर कंपनीचा. सभासद रक्कम ५०० पासून . ११० रु .- करण्याचा कंपनीचा निर्णय.【कार्यकारी संचालक.- बाळासाहेब वाघमारे यांची माहिती.】

आजरा.प्रतिनिधी.२५.

आजरा येथे नव्याने सुरू असलेला आजरा समृद्धी प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून व्यवसाय अधिक गतिमान होण्यासाठी इच्छुक खातेदाराने सभासद व्हावे.
या कंपनीमधुन आजरा तालुक्‍यात सुमारे एक लक्ष किग्रँ. दररोज निर्मिती क्षमतेच्या बायो सीएनजी प्रकल्पाची सुरुवात होत असून आजरा तालुक्यात विकास सर्वांगीण करण्याच्या दृष्टीकोनातून सदर प्रकल्पाची सुरुवात होत आहे.
आजरा तालुक्यातील स्वच्छ इंधन प्रकल्पाद्वारे या कंपनीचा, कॅन्सर मुक्त करायचा आहे. सदर प्रकल्पामुळे संपूर्ण तालुक्यात इंजिनामध्ये स्वयंपूर्ण करणारा हा प्रकल्प असून यामध्ये वाहतुकीचे इंधन पेट्रोल डिझेल खनिज सीएनजी याला १००% पर्याय आहे.
या स्वच्छ इंधनामुळे आपला आजरा तालुका प्रदूषण मुक्त होण्यासाठी मदत होणार आहे.
इंधन निर्मिती साठी लागणारा कच्चामाल शेतातच निर्माण होणार असून कर्जमुक्त असा करार शेती वतीने शेतकऱ्यांसाठी शाश्वत व चांगले उत्पन्न देऊन आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी ही कंपनी कार्य करणार आहे. तर आजच्या तरुण पिढीला या कंपनीच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबामध्ये शाश्वत व कायमचे असे उत्पन्न मिळविण्याचे साधन या कंपनीतून निर्माण होणार आहे.
यासाठी प्रत्येक गावातील तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मजुराच्या कामगारांच्या पदवीधारक तरुणांच्या विकासासाठी संघटित होण्याची गरज आहे. यासाठी या कंपनीमध्ये सर्वसामान्य शेतकरी, भुमीहिन, अल्पभुधारक गोरगरीब शेतकरी वर्गाला सभासद होता यावे. यासाठी कंपनीने ५०० रु ,सभासद रक्कम केली आहे. परंतु या कंपनीमध्ये गोरगरीब शेतकरी वर्गाला सभासद होणेसाठी ११० रु रक्कम सभासद होणेसाठी केली असल्याची माहिती कार्यकारी संचालक बाळासाहेब वाघमारे यांनी दिली. परंतु शेअर्स भागभांडवल प्रमाणात सभासदाना डेव्हि डंट किंवा इतर लाभ दिले जाणार आहेत. तसेच ११० रु सभासद रकमेमुळे कुटुंबातील अनेक सभासद होतील. यासाठी कंपनीने ५०० रु शेअर्स सोबत ११० रु करण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क करावा. असे अवाहन संचालक मंडळाने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.