HomeUncategorizedअजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशीची मागणी - सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशीची मागणी – सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशीची मागणी – सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

मुंबई.- प्रतिनिधी.

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीकडून पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या मनातही अपघाताच्या संदर्भाने बरेच प्रश्न आहेत. राष्ट्रवादीच्या निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी मनातल्या शंकांची चौकशी सीबीआयमार्फत व्हावी, अशी मागणी केली.

अजित पवारांच्या विमान अपघातानंतर वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. अजित पवारांचा अपघात की घातपात अशी चर्चा ही सुरू झाली आहे. रोहित पवारांनी तर हा अपघात नाही तर घातपात असल्याची शंका उपस्थित केली होती. त्यानंतर आता सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यांनी या अपघाताची सीबीआय चौकशी केली जावी अशी मागणी केली आहे. तसे निवेदन ही देण्यात आले आहे.

सुनेत्रा पवार यांच्या मनात कोणकोणत्या शंका?

अखेरच्या क्षणी विमानाचे कर्मचारी बदलले

एटीसीनं दिलेल्या सूचना आणि लँडिंगचा क्लिअरन्स यात विसंगती
विमानातील अत्यंत महत्त्वाच्या वॉर्निंग सिस्टीमबाबत

साशंकता

लँडिंगवेळी संकटात असल्याचं कुठलंही संभाषण रेकॉर्डिंग नाही

विमान, देखभाल दुरुस्ती आणि कर्मचाऱ्यांचं फिटनेस

ज्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली त्याचवेळी संबंधित खात्याचे केंद्रीय मंत्री नायडू, मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. यापूर्वी अशा घटनांसाठी स्वायत्त यंत्रणा नेमलेल्या आहेत. त्या यंत्रणांनी तपास सुरू केल्याचे घोषित केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. स्वायत्त यंत्रणा तपास करत आहेत पण सीबीआय तपास करत असताना आणखी व्यापकतेने तपास होऊ शकतो, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.