आजरा हायस्कूलमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
आजरा.- प्रतिनिधी.
येथील आजरा हायस्कूलमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२६ जनता एज्युकेशन सोसायटी संचालित आजरा हायस्कूलमध्ये भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थितांच्या स्वागतानंतर कॅप्टन संजय चव्हाण व एन.सी.सी ऑफिसर एस. जी .नाईक यांनी एन.सी.सी. रिपोर्टिंग केले. जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थितांनी सामूहिक राष्ट्रगीत गायले. कु. दिव्या रामचंद्र गावडे हिने भारतीय संविधानाच्या सरनाम्याचे वाचन केले.
अण्णा भाऊ इंग्लिश मेडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. आजरा हायस्कूलच्या एन.सी.सी. कॅडेट्सनी डी.एस.टी. ड्रील आणि आजरा हायस्कूलच्या सर्वच विद्यार्थ्यांनी सुंदर संगीतमय कवायतीचे सादरीकरण केले. या विद्यार्थ्यांना एस जी नाईक, एम .एस .गोरे व सौ एम. पी .चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. इयत्ता पाचवी ते आठवीतील आदर्श , गुणवंत विद्यार्थी ,विद्यार्थिनी , बेस्ट एन.सी.सी कॅडेट, उत्कृष्ट खेळाडू या पारितोषिकांचे वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले .पारितोषिक पात्र विद्यार्थी पुढील प्रमाणे –
आरुष आपटे,वैष्णवी पाटील, राजेश पाटील, गतिमा अडकुरकर, सिद्धेश गुरव, अदिती भातखंडे, अक्षरा पाटील, वेदांत प्रभू, सार्थक अजगेकर, विजयालक्ष्मी पाटील, सुयश मादयाळकर, कादंबरी रेडेकर असे पारितोषिक पात्र विद्यार्थी होते.
- प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून इंग्रजी विभागाने भारतीय संविधानावर भित्तिपत्रक तयार केले होते. त्याचे उद्घाटन जनता एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री. नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. चराटी, उपाध्यक्ष सी.ई.ओ डॉ अनिल देशपांडे, सचिव रमेश कुरुणकर, सर्व संचालक, सल्लागार, सर्व शाखांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी. डी. कांबळे यांनी केले. तर सौ. टी. एस. पाटील यांनी परितोषिक वाचन केले. सौ. व्ही. पी. हरेर यांनी आभार मानले.
