मडिलगे ग्रामपंचायत पटांगणात –
प्रजासत्ताक दिन साजरा.-
झेंडावंदन – राजेंद्र देसाई (आजरा ) यांच्या शुभहस्ते.
आजरा.- प्रतिनिधी.

मडिलगे ता. आजरा येथील ग्रामपंचायत वतीने प्रजासत्ताक दिना साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच बापू निऊगरे होते. राजेंद्र देसाई ( आजरा ) यांच्या शुभहस्ते झेंडावंदन करण्यात आले. मडिलगे गावातील पानंत रस्ते विकास यामध्ये रस्ता करण्यासाठी आपल्या जागेतून ( शेतातून ) शासनाच्या मातोश्री पानंद रस्ते विकास करण्यासाठी आपली जागा देऊन सहकार्य केले या मार्गावर जाणारी शेतकरी यांना या रस्त्याच्या लाभ मिळणार आहे. शेतावर जाणाऱ्या पानंद रस्त्यावर जागा देऊन त्यांचे योगदान दिल्याबद्दल श्री देसाई यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.

देशात राज्यात
आज २६ जानेवारी २०२६, भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आहे. हा दिवस भारतीय संविधान लागू झाल्याच्या गौरवशाली दिवसाचे प्रतीक आहे. प्रजासत्ताक दिनाचे विशेष महत्त्व – म्हणजे – भारतीय संविधानाची अंमलबजावणी, लोकशाही आणि स्वातंत्र्याचा दिवस
राष्ट्रीय एकता आणि देशभक्तीचा दिवस प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशातील विविध उपक्रम दिल्लीतील कर्तव्य पथावर परेड राष्ट्रपतींचे भाषण – देशभक्ती गीत आणि झेंडावंदन, शाळा आणि कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम
होतात ग्रामपंचायत स्तरावरील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व शासकीय कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्य या झेंडावंदन कार्यक्रमासाठी प्राथमिक शाळेचे माध्यमिक ( हायस्कूलचे ) मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी व, ग्रामपंचायत उपसरपंच पांडुरंग जाधव, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध पक्षांचे स्थानिक नेते पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मचारी, विविध संस्थेचे पदाधिकारी आजी-माजी सैनिक संघटनेचे सदस्य ग्रामस्थ उपस्थित विद्यार्थ्यांच्या कडून देशभक्तीपर गीताचे गायन केले जाते. व विद्यार्थ्यांच्या कडून विविध विषयावरती मनोगत व्यक्त केले जाते. सोबत पारितोषिक वितरण समारंभ होतो. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या ग्रामस्थ विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत वतीने सत्कार केला जातो. या प्रजासत्ताक दिनानिमित्त मोठ्या संख्येने ग्रामस्थ महिला उपस्थित होते.
