🛑श्रीमंत गंगामाई वाचन – आयोजित मायदेव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महिलांची सुगम गायन स्पर्धा उत्साहात संपन्न.
🟣विद्यार्थ्यानी व्यवसाय म्हणून शेती स्वीकारली पाहिजे शेती मित्र – शरद देवेकर
( कृषी तंत्रनिकेतन गारगोटी येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न.)
🛑श्रीमंत गंगामाई वाचन – आयोजित मायदेव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महिलांची सुगम गायन स्पर्धा उत्साहात संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा तर्फे कै उर्मिला श्रीपाद मायदेव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महिलांची सुगम गायन स्पर्धाउत्साहात पार पडली स्पर्धेची सुरवात कै उर्मिला मायदेव यांच्या प्रतीमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. सौ. विनया मायदेव या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. वाचनालयाच्या उपाध्यक्षा सौ. विद्या हरेर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
महिलांच्या सुगम गायन स्पर्धेत कु. नाझीया सलिम सोलापूरे (आजरा) यांनी प्रथम क्रमांक मिळविला, सौ. पूजा कौस्तुभ पाटील (आजरा) यांनी व्दितीय तर सौ. निता चेतन हरेर (कासार कांडगाव) यांनी तृतीय क्रमांक मिळवीला विजेत्यांना सौ. विनया मायदेव, विद्या हरेर व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले सुगम गायन स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून सौ. रूपा कडवाले व श्रीमती मीना शिरगुप्पे यांनी तर संगीत संयोजन डॉ. कृष्णा होरांबळे, सुरेंद्र हिरेमठ व चंद्रकांत ठाकूर यांनी केले.
यावेळी वाचनालयाचे सहकार्यवाह रविंद्र हुक्केरी, विजय राजोपाध्ये, संभाजी इंजल, बंडोपंत चव्हाण, सुभाष विभुते, डॉ. अंजनी देशपांडे, यशोदा कुंभार, रेखा बटकडली, वैशाली पंडित, माया डोंगरे, स्मिता गव्हाणकर, उज्वला पाटील, सुजाता तोडकर, ज्ञानदेव पाटील, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर, प्रा. संदीप देसाई, निखिल कळेकर, महादेव पाटील यांसह संगीतप्रेमी नागरिक उपस्थित होते. यानिमित्ताने आयोजित महिलांच्या हळदी कुंकू कार्यक्रमासही महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या. संचालिका सुचेता गडडी यांनी स्वागत केले. कार्यवाह कुंडलिक नावलकर यांनी सुत्रसंचालन केले तर सौ गिता पोतदार यांनी आभार मानले.
🟣विद्यार्थ्यानी व्यवसाय म्हणून शेती स्वीकारली पाहिजे शेती मित्र – शरद देवेकर
( कृषी तंत्रनिकेतन गारगोटी येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न.)
गारगोटी – प्रतिनिधी.

श्री मौनी विद्यापीठ गारगोटी संचलित कृषी तंत्रनिकेतन गारगोटी येथील वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन, दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अरविंद चौगले होते. स्वागत व प्रस्ताविक बी.सी देसाई यांनी केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र शासनशेतीमित्र पुरस्कार प्राप्त शरद देवेकर मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असणाऱ्या कौशल्याचा उपयोग करून येणाऱ्या अडीअडचणीचा सामना करून आपल्या कृषी उद्योगाची भरभराट करावी. कृषी व्यवसायात यश प्राप्त कसे करावे. हे त्यांनी आपल्या स्वतःच्या उदाहरणावरून सिद्ध केले. कृषी तंत्र निकेतनच्या प्राचार्या सौ पी. पी. देसाई यांनी मौनी विद्यापीठाच्या बौद्धिक व प्रात्यक्षिक कामाबद्दल केल्या जाणाऱ्या कार्याचा उहापोह केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष कर्मचारी प्रतिनिधी यांनी डॉ. श्री चौगुले आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी आपल्या क्षेत्रात सातत्याने प्रयत्न करणे. कोणतेही भिडभाड न ठेवता कृषी निविष्ठांचे विक्री करावी. त्यासोबत बाजार मागणी व पुरवठा यांचा वेळोवेळी अभ्यास करावा असे सुचित केले.
विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवल्याबद्दल उपस्थितांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल देऊन सत्कार करण्यात आला. दुपारच्या सत्रात विविध गुण दर्शनाच्या कार्यक्रमात विविध गुणदर्शन सांस्कृतीक कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. गिरिजा जोशी मॅडम व कु. समृद्धी पावले यांनी केले. तर सुजय पोफळे यांनी आभार मानले
