राज्यातील पहिल्या योग व निसर्गोपचार महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न नाम. हसन मुश्रीफ यांच्या विशेष प्रयत्नातून चालू असलेले महाविद्यालय .
आजरा.- प्रतिनिधी.
आयुष संचालनालय, मुंबई यांच्या अधिपत्याखाली महाविद्याल्याच्या अधिष्ठाता वैद्य.भाग्यश्री खोत यांच्या नेतृत्वाखाली शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालयच्या जे. पी.नाईक स्मारक भवन येथे, उत्तूर ता. आजरा येथे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन “तरंग २०२५-२६” दि.१२.०१.२०२६ ते १७.०१.२०२६ या कालावधीमध्ये विविध कार्यक्रम दिमाखात पार पडले गेले.
दि. १२ रोजी या महास्नेहसंमेलनाच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून दीपक पाटील, सामाजिक कार्यकर्ते, याचसोबत, नरसू पाटील प्रशासकीय अधिकारी, वैद्य. शिवानी गावंडे अधिष्ठाता केदारी रेडेकर आयुर्वेद महाविद्यालय गडहिंग्लज यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती यांचे शुभहस्ते या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या “स्टुडंट गॅलरी”चे उद्घाटन झाले. यामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेले चार्ट व मॉडेल्सचे परीक्षण अधिष्ठाता केदारी रेडेकर आयुर्वेद महाविद्यालय अधिष्ठाता यांनी केले. यानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर क्रिकेट, व्हॉलीबॉल तसेच इतर मैदानी क्रीडा स्पर्धांचे औपचारिक उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित करण्यात आले.
दिनांक १६ व १७ जानेवारी २०२६ रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून लाभलेले बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर झोनचे आदरणीय झोनल मॅनेजर श्री. पुनित अवध द्विवेदी सर, शासन प्रतिनिधी म्हणुन मा.नारायण मद्रासी आणि संस्थयेच्या अधिष्ठाता , यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर श्री. पुनित अवध द्विवेदी सर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला व विजेत्या विद्यार्थ्यांना पदके, चषक व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.समारोप प्रसंगी सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते
या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थी परिषद सल्लागार देसाई सर, क्रीडा समन्वयक डॉ. जीवन हनवते, सांस्कृतिक समन्वयक डॉ. शीतल बनसोडे तसेच कोष समन्वयक डॉ. किशोर उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.या सहा दिवसांच्या स्नेहसंमेलनात विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कबड्डी, खो-खो, क्रिकेट, धावणे, बुद्धिबळ आदी क्रीडा प्रकारांसह नृत्य, गायन, नाट्य, योग प्रात्यक्षिके अशा विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि प्रेक्षकांची मोठी उपस्थिती हे या स्नेहसंमेलनाचे वैशिष्ट्य ठरले. महाविद्यालय परिसर संपूर्ण कालावधीत आनंद, उत्साह व सकारात्मक ऊर्जेने भारलेला होता.
