आंदोलनाला आले यश! १७ दिवसांचे आंदोलन तात्पुरते स्थगित – संग्राम सावंत.
गारगोटी.- प्रतिनिधी.
अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गुन्हे दाखल करण्यासाठी गटविकास अधिकारी यांना पत्र देण्यासाठी दिले आदेश आंदोलनाला आले यश! आंदोलन तात्पुरते स्थगित केले असल्याचे संग्राम सावंत यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार
अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने गेली १७ दिवस भुदरगड पंचायती समोर बेमुदत ठिय्या आंदोलन व बेमुदत आत्मक्लेश सत्याग्रही आंदोलन सुरू होते यातील ग्रामपंचायतीच्या चौकशी बाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती भुदरगड यांनी नऊ जणांची समिती नेमली आहे आणि ती येत्या काही दिवसात चौकशी करून तो चौकशी अहवाल घटकास अधिकारी यांना सादर करणार आहे तसेच ग्राम संघाच्या पाच ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या बैठकीमध्ये उमेद कर्मचारी व सीआरपी यांना कोंडून घालून दमदाटी व शिवीगाळ आणि आणि सीआरपींच्या अंगाशी झोंबा झोंबी केलेल्या सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा यासाठी काल दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या दालनात बैठक झाली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस.,
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी साहेब यांनी गुन्हे दाखल गटविकास अधिकारी,भुदरगड यांना पोलीस स्टेशनला पत्र व व्हिडीओ देण्यासाठी काल झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनातील बैठकीत सांगण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब बैठकीत बोलले की CRP मॅडम मी तुमच्यासोबत कायम आहे. तुम्हाला काही आमच्याकडून जी मदत हवी असेल ती आम्ही करू. हवं तर मी sp सरांशी बोलतो.आणि तुम्हाला जे पत्र पाहिजे आहे. ते तुम्हाला उद्या दिले जाईल. गटविकास अधिकारी यांना पत्र देण्याचे आदेश दिले.
गुरूवार दि. 22-01-2026 रोजी आरळगुंडी ग्रामसंघाच्या दि.5 ऑगस्ट, 2025 रोजी झालेल्या बैठकीमध्ये उमेद कर्मचारी व सीआरपी यांना कोंडून घालून दमदाटी व शिवीगाळ आणि सी.आर.पी.च्या अंगाशी झोंबा झोंबी केलेल्या सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. यासाठी काल दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री कार्तिकेयन एस, अतिरिक्त सीईओ संतोष जोशी, गटविकास अधिकारी डॉ.शेखर जाधव, अखिल भारतीय किसान सभेचे समन्वयक संग्राम सावंत, सी.आर.पी. सौ.सारिका विनोद देवेकर, दिगंबर विटेकरी, कृष्णा कांबळे, युवराज पाटील, अश्विनी कांबळे, विनोद देवेकर, सुनील जाधव,श्री.अरुण कांबळे, उज्वला पाटील BMM, गजानन भोसले, अस्मिता पाटील, वैशाली सोनार, निलेश डवरी सर्व प्रभाग समन्वयक यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
बेमुदत आत्मक्लेष सत्याग्रही आंदोलन हे बेकायदेशीररित्या मंदिरात कोंडून ठेवून शासकीय कामात अडथळा केलेला आहे. आपल्या विभागाच्या वतीने सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा. यासाठी प्रशासनाने दिलेल्या पत्रानुसार कार्यवाही व कारवाई सुरू होणार असल्यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करीत आहोत.
बेमुदत आत्मक्लेष सत्याग्रही आंदोलन करणार आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही. न्यायिक बाजूने तोपर्यंत हे बेमुदत आत्मकलेश आंदोलन चालू होते. हे आंदोलन बेकायदेशीररित्या मंदिरात कोंडून ठेवून शासकीय कामात अडथळा केलेला आहे. पंचायत समिती व पोलीस स्टेशन गारगोटी विभागाच्या प्रशासनाच्या वतीने सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा. यासाठी मा.पोलीस निरीक्षक गारगोटी पोलीस स्टेशन व गटविकास अधिकारी पंचायत समिती भुदरगड यांनी तत्परता दाखवून ताबडतोब गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करणे गरजेचे आहे.
भुदरगड पोलीस प्रशासनाने व भुदरगड पंचायत समिती प्रशासनाने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांना आम्ही मनःपूर्वक धन्यवाद देतो. असेच न्यायिक बाजूने जनतेला न्याय मिळावा. म्हणून आपले सहकार्य व मदत नेहमी मिळावी. असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
