मुंबईत पुन्हा होणार महिला महापौर; २९ महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर.
मुंबई :- प्रतिनिधी
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौरपदाची आरक्षण सोडत आज गुरूवारी जाहीर झाली आहे. यामध्ये राज्यातील सर्वाधिक चर्चिल्या जाणाऱ्या मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि पिंपरी चिंचवड या शहरांचे महापौरपद खुला प्रवर्ग प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आले आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांतील बलाढ्य आणि दिग्गज नेत्यांना आता महापौरपदाच्या खुर्चीवर बसण्याची संधी मिळणार आहे.
खुला प्रवर्गासाठी आरक्षित झालेली प्रमुख
शहरेः-
महानगरेः-मुंबई (महिला), नवी मुंबई, पुणे (महिला), छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, पिंपरी चिंचवड (महिला).
इतर शहरेः-अमरावती, भिवंडी (महिला), वसई-विरार, मीरा भाईंदर, मालेगाव, परभणी, सोलापूर, नांदेड, धुळे (महिला), सांगली.
○ खुला प्रवर्ग असल्याने आता जातीचे
कोणतेही बंधन उरलेले नाही. परिणामी, मुंबईत भाजप-शिंदे युती आणि पुण्यात महायुतीमधील ‘हेवीवेट’ नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुंबई महापालिकेत भाजपने मोठे यश मिळवले आहे, तर ठाकरे गटानेही चिवट झुंज दिली आहे. आता खुला प्रवर्ग निघाल्याने येथे कोणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
आजच्या आरक्षण सोडतीनंतर आता १५ दिवसांच्या आत महापौर निवडीसाठी विशेष सभा बोलावल्या जातील. ज्या शहरांत खुला प्रवर्ग (महिला) असे उप-आरक्षण पडले आहे, तिथे केवळ महिलांना संधी मिळेल, तर उर्वरित ठिकाणी चुरस अधिक असेल.
