🟣पाणी, सांडपाण्यासाठी गटार याची कोणतीही सुविधा करून दिली नाही.- आजरा नगरपंचायत व तहसीलदार यांना रहिवासी यांचे निवेदन.
🟣मराठी भाषा ही आपली अस्मिता आहे – प्रा. डॉ. आनंद बल्लाळ (आजरा महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उदघाटन.)
🟣वंचित बहुजन आघाडी कोल्हापुर दक्षिण.- ७० एबी फॉर्म वर जि. प. प.स. लढवणार.
🟣पाणी, सांडपाण्यासाठी गटार याची कोणतीही सुविधा करून दिली नाही.- आजरा नगरपंचायत व तहसीलदार यांना रहिवासी यांचे निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.

पाणी, सांडपाण्यासाठी गटार याची कोणतीही सुविधा करून दिली नाही. आजरा नगरपंचायत व तहसीलदार यांना रहिवासी यांचे निवेदन गट नंबर ३४९ में होडगे कॉलनी आजरा या गटातील सर्व रहिवाशी यांनी कॉलनीतील विविध प्रलंबित प्रश्नाबाबत आजरा नगरपंचायत मुख्याधिकारी व आजरा तहसीलदार यांना निवेदन दिले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
गट नंबर 359 अ या गटातील तयार केलेल्या कॉलनीमध्ये सुरेश होडगे डेव्हलपर यांनी रस्ता पाणी, सांडपाण्यासाठी गटार याची कोणतीही सुविधा करून दिली नाही याबाबत,
उपरोक्त विषयास अनुसरून आम्ही सर्व गट नंबर 359 अ या होडगे कॉलनीतील रहिवाशी असून सन २०२८/१९ या कालावधीत श्री होडगे यांच्याकडून या गटातील प्लॉट खरेदी केले होते. खरेदी करण्यात आली होती. त्यावेळी या व्यक्तीनी आम्हासर्वानां पक्का रस्ता, लाईट, पाणी व गटार या सर्व सुविधा पुरवितो असे सांगण्यात आले होते. त्या पध्दतीचा खरेदी दस्तामध्ये तसे नमूद करण्यात आले होते. त्याच्या या शब्दावर विश्वास ठेवून या गटातील प्लॉट खरेदी करून आम्ही आमच्या घराची बांधकामे काढली आज आमच्या बांधकामाना ६ वर्षे झाली तरी पण या व्यक्तीकडून कोणत्याही प्रकाराची सुविधा अजून ही कॉलनीमध्ये पुरविण्यात आलेली नाही. रहिवाशी घरे असल्याने कॉलनीमध्ये सांडपाण्याचा निचरा होत नाही त्यामुळे दुर्गंध पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रोगराई पसरण्याची भिती निर्माण झाली आहे. याबाबत सर्व कॉलनीतील ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या नियोजनावर उपस्थित सर्व रहिवासी यांच्या सह्या आहेत.
🟣मराठी भाषा ही आपली अस्मिता आहे – प्रा. डॉ. आनंद बल्लाळ
( आजरा महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उदघाटन.)
आजरा – प्रतिनिधी

मराठी केवळ आपली बोलण्याची भाषा नसून ती आपली संस्कृती आणि अस्मिता आहे. त्यामुळे मराठी भाषेचा वारसा जपण्याचा निर्धार आपण केलाच पाहिजे, असे मत मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. आनंद बल्लाळ यांनी व्यक्त केले.
आजरा महाविद्यालयात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ उद्घाटन समारंभाचे आयोजन नुकतेच करण्यात आले. प्राचार्य प्रा. डॉ. अशोक सादळे कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
राज्य शासनाच्या धोरणानुसार मराठी भाषेचा वापर वाढावा, भाषेचे जतन व्हावे आणि तरुण पिढीला मराठी साहित्याची ओढ लागावी, या उद्देशाने या विशेष पंधरवड्याचे आयोजन करण्यात येते, असे सांगून डॉ. बल्लाळ पुढे म्हणाले की, आजच्या जागतिकीकरणाच्या युगात आपण इतर भाषा शिकल्या पाहिजेतच, पण आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगून तिचा दैनंदिन व्यवहारात वापर करणे गरजेचे आहे.
यावेळी उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ, पर्यवेक्षक प्रा. मनोजकुमार पाटील, कार्यालय अधीक्षक योगेश पाटील, प्रा. रमेश चव्हाण, प्रा. शेखर शिउडकर आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. आप्पासो बुडके यांनी सूत्रसंचालन तर प्रा. विनायक चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.
🟣वंचित बहुजन आघाडी कोल्हापुर दक्षिण.- ७० एबी फॉर्म वर जि. प. प.स. लढवणार.
गारगोटी.- प्रतिनिधी.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर दक्षिण अंतर्गत येणाऱ्या राधानगरी, भुदरगड, आजरा, कागल, गडहिंग्लज, चंदगड या सहा तालुक्याची गारगोटी येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली
यावेळी प्रमुख उपस्थिती सोमनाथ साळुंखे
(राज्य उपाध्यक्ष व कोल्हापूर जिल्हा निरीक्षक) यांनी सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखति घेण्यात आल्या एकूण ७० फॉर्म भरण्यात आले त्या वेळी उपस्थित दिपक कांबळे जिल्हा महासचिव यांनी मानोगत व्यक्त केले. तसेच वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष पेठवाडगांव नूतन नगरसेवक मिलिंद सनदी यांनी मनोगत व्यक्त केले. त्यावेळी भीमराव तांबे दत्तात्रय कांबळे संतोष मासोळे संदीप कांबळे प्रवीण कांबळे बेबिताई कांबळे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
