🛑अखिल भारतीय किसान सभेच्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला आले यश.
🛑शक्तीपीठ महामार्गाच्या आरेखनात बदल.- पेरणोली येथे प्रमुख कार्यकर्त्यांची सोमवारी व्यापक बैठक…
🛑व्यंकटराव शिक्षण संकुलात इ. दहावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन संपन्न.
🛑आजरा महाविद्यालयाच्या ‘राष्ट्रीय सेवा योजने’च्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे सोहाळे येथे दिमाखात उद्घाटन.
🛑अखिल भारतीय किसान सभेच्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला आले यश.
गारगोटी.- प्रतिनिधी.

आरळगुंडी ग्रामपंचायतीची सखोल चौकशी साठी मंगळवार दि.६ जानेवारी,२०२६ पासून भुदरगड पंचायत समिती कार्यालयासमोर अखिल भारतीय किसान सभा या संघटनेच्या वतीने “बेमुदत ठिय्या आंदोलन” सुरू होते. त्या आंदोलनाला अखेर यश आले. आरळगुंडीच्या विविध मागण्यांच्या गटविकास अधिकारी सखोल व बिनचूक सविस्तर अहवाल लेखी स्वरूपात संघटनेला देण्यासाठी गट विकास अधिकारी यांनी नऊ जणांची चौकशी समिती नेमलेली आहे. याबाबतीत गटविकास अधिकारी यांनी चौकशी समिती नेमून ग्रामपंचायत आरळगुंडी ता. भुदरगड जि.कोल्हापूरच्या कारभाराची सखोल बिनचुक व सविस्तर चौकशी करून दोषींवर ताबडतोब कारवाई करणार आहे.असे लेखी पत्राद्वारे आम्हाला आश्वासन दिलेले आहे.
मात्र बेमुदत आत्मक्लेष सत्याग्रही आंदोलन करणार आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही. न्यायिक बाजूने तोपर्यंत हे बेमुदत आत्मकलेश आंदोलन चालू राहणार आहे. बेकायदेशीररित्या मंदिरात कोंडून ठेवून शासकीय कामात अडथळा केलेला आहे. आपल्या विभागाच्या वतीने सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा. यासाठी आपण ताबडतोब ही प्रक्रिया पूर्ण करावी.यासाठी हे आंदोलन सुरू राहणार. या आंदोलनात
अखिल भारतीय किसान सभा
कॉ.संग्राम सावंत ॲड.दशरथ दळवी सारिका देवेकर
मेघाराणी भाईंगडे, धनाजी शेटके, युवराज पाटील, मारूती पाटील, उत्तम कांबळे, सुनिल जाधव, दयानंद पाटील, विनोद देवेकर, गीता पाटील, शाहूबाई देवेकर, मीना पाटील,बयाबाई पाटील, कृष्णा शेटके,रंजना पाटील, मारूती पाटील,अश्विनी कांबळे, सुप्रिया देवेकर, पुजा पाटील व आरळगुंडी ग्रामस्थ सहभागी होते.
🛑शक्तीपीठ महामार्गाच्या आरेखनात बदल.- पेरणोली येथे प्रमुख कार्यकर्त्यांची सोमवारी व्यापक बैठक…
आजरा – प्रतिनिधी.
शक्तीपीठ महामार्गाचे आरेखनात मोठा बदल केला असून भुदरगड तालुक्यातून हा मार्ग आता कोरिवडे, हरपवडे, पेरणोली, देवर्डे, वेळवट्टी, पेठेवाडी, मसोली, खानापूर, पोळगाव, एरंडोळ वरून पुढे चंदगड तालुक्यातून बांध्याकडे जाणार आहे. या महमार्गामुळे पर्यवर्णाची अपरिमित हानी तर होणारच पण त्याचबरोबर कोरिवडे, हरपवडे, पेरणोली, देवर्डे, वेळवट्टी या शिवारातील शेतजमीन मोठ्या प्रमाणात घेतली जाणार आहे. सोलापूर जिल्हयातून सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील दुष्काळी गावातून सांगली कोल्हापूर असा भुदरगड तालुक्यातून हा मार्ग आजरा, चंदगड मार्गे बांदा असा नेण्याचा घाट सरकारने घातला आहे. या विभागातील कोणत्याही शेतकऱ्यांची मागणी नसताना केवळ ठेकेदारांचे हितसंबंध सांभाळण्यासाठीच हा महामार्ग बनवला जाणार आहे. पर्यावरणाची हानी करणारा आणि शेतकऱ्यांना उध्वस्त करणाऱ्या या महामार्गाला आमचा तीव्र विरोध आहे.
खरंतर शक्तीपीठ महमार्गाची गरज नसताना तो शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारला जात आहे.या महामार्गामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होणार असून पुरासारख्या महाभयानक संकटाला इथल्या जनतेला वारंवार सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळं या महामार्गाला येथील शेतकऱ्यांचा आणि पर्यावरण वादी जनतेचा तीव्र विरोध आहे.
यापूर्वी आजरा येथे भरपावसात झालेल्या महामोर्चाने लोकांच्या मनात असलेला राग दाखवून दिला आहे. शक्तीपीठ महामार्ग आजरा, चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्यातील शेतकरी विरोध करतीलच पण महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संघर्षात आम्ही कायम आघाडीवर रराहणार आहोत. सरकारचा हा जनविरोधी, शेतकरी विरोधी, पर्यावरणाला बाधा आणणारा महामार्ग हाणून पाडू. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली सोमवार दि १२ जानेवारी २०२६ रोजी ठीक ११.०० वाजता पेरणोली येथील रवळनाथ मंदिरात कार्यकर्त्यांची व्यापक बैठक बोलावली आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात येणार आहे. तरी या बैठकीला सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक कॉम्रेड संपत देसाई, सुधीर देसाई, तानाजी देसाई, अमरसिंग पवार, आनंदराव कुंभार, राजू होलम, युवराज पोवार, युवराज जाधव, मारुती पाटील यांनी केले आहे.

🛑व्यंकटराव शिक्षण संकुलात इ. दहावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील व्यंकटराव शिक्षण संकुलामध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था,(सारथी )उपकेंद्र कोल्हापूर येथे कार्यकारी अधिकारी शिक्षण या पदावर काम करणारे डॉ. विलास पाटील यांनी जवळजवळ 300 विद्यार्थ्यांना त्यांच्या इयत्ता दहावी नंतर करिअर साठी विविध वाटांबद्दल आपल्या अमोघ वाणीतून मार्गदर्शन केले. यासाठी त्यांनी समाजातील विविध व्यक्तींची उदाहरणे देऊन त्यांनी मिळवलेले त्यांच्या जीवनातील यश सांगितले. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अथक परिश्रम जिद्द चिकाटी असणे गरजेचे आहे असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी व्यंकटराव हायस्कूल आजरा बरोबरच आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा संचलित आदर्श हायस्कूल शिरसंगी, भादवण हायस्कूल भादवण या प्रशालेतीलही इयत्ता दहावीचे विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते. व्यासपीठावर प्राचार्य एम एम नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ व्ही जे शेलार, ए के पावले, एम एम देसाई, आर पी होरटे, सौ.ए.डी.पाटील, श्रीमती एस टी पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी व्ही पाटील व आभार व्ही एच गवारी यांनी मानले.
🛑आजरा महाविद्यालयाच्या ‘राष्ट्रीय सेवा योजने’च्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे सोहाळे येथे दिमाखात उद्घाटन

जनता एज्युकेशन सोसायटी संचलित आजरा महाविद्यालय, आजरा येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने मौजे सोहाळे (ता. आजरा) येथे सात दिवसीय ‘विशेष श्रमसंस्कार शिबिराचे’ उत्साहात उद्घाटन करण्यात आले. ‘जलसंधारण व शास्वत विकासामध्ये युवकांचा सहभाग’ हा मंत्र घेऊन दि. ८ ते १४ जानेवारी २०२६ या कालावधीत हे शिबिर पार पडणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष जनता एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. श्री. विलास नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी ग्रामीण विकासात युवकांचे योगदान महत्त्वाचे असून श्रमसंस्कारातूनच उद्याचा जबाबदार नागरिक घडतो, असे प्रतिपादन केले. युवा शक्तीचा वापर विधायक कामांसाठी केल्यास समाजामध्ये शाश्वत विकास घडून येईल. या सात दिवशीय शिबिरामध्ये पशुचिकित्सा व आरोग्य तपासणी शिबिर, पाणवठा स्वच्छता, ग्रामस्वच्छता याबरोबरच काजू पिक लागवड तंत्रज्ञान, जल जंगल आणि जमीन, अंधश्रद्धेकडून विवेकवादाकडे या विषयांवर व्याख्यान तसेच महिला आरोग्य आणि सबलीकरण, मताधिकार जनजागृती अभियान अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी रुजवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगितले. सोहाळे गावच्या सरपंच मा. सौ. भारती डेळेकर यांनी शिबिरासाठी ग्रामपंचायतीचे पूर्ण सहकार्य राहील अशी ग्वाही दिली.
मौजे सोहाळे येथे ‘श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने मान्यवरांचे शाल, पुष्प व गावातील नागरिक श्री. मारुती डेळेकर लिखित ‘बंध’ या कथासंग्रह देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.

या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थचे संचालक डॉ. दिपक सातोसकर, के. व्ही. येसणे तसेच उपसरपंच वसंत कोंडुसकर, पोलीस पाटील माया कोंडूसकर (सोहाळे), मधुकर डेळेकर (बाची), ग्रामपंचायत सदस्य सौ. रेखा कांबळे, रमा कांबळे, श्री. महादेव पाटील, श्री. संदीप देसाई उपप्राचार्य प्रा. डी. पी. संकपाळ आणि कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनएसएस प्रकल्पाधिकारी डॉ. अविनाश वर्धन यांनी केले. सूत्रसंचालन ज्युनिअर विभागाचे प्रकल्पाधिकारी प्रा. रत्नदीप पवार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार श्रीमती वैशाली देसाई यांनी मानले. या उद्घाटन कार्यक्रमाला ग्रामस्थ आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
