दि आजरा अर्बन को-ऑप. बँकेच्या चेअरमनपदी अशोक काशिनाथ चराटी व व्हा. चेअरमनपदी संजय विष्णू चव्हाण यांची निवड.
आजरा.- प्रतिनिधी.
दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट) या बँकेच्या चेअरमनपदी अशोक काशिनाथ चराटी व व्हाईस चेअरमनपदी संजय विष्णू चव्हाण यांची एकमताने निवड करुन बँकेच्या संचालक मंडळाने यापुर्वीची बिनविरोध निवडीची परंपरा कायम राखलेली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून (जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कोल्हापूर अमोल येडगेसो यांनी काम पाहीले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरवसो (निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी कोल्हापूर), प्रेम राठोडसो (सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था करवीर), सुजय येजरे (सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था आजरा) उपस्थित होते.
चेअरमन पदासाठी अशोक काशिनाथ चराटी यांचे नांव जयवंत यशवंत खराडे यांनी सुचविले. त्यास सुनील माधवराव देशपांडे यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमन पदासाठी संजय विष्णू चव्हाण यांचे नांव विनय भालचंद्र सबनीस यांनी सुचविले. त्यास सिद्धेश विलास नाईक यांनी अनुमोदन दिले. नुतन चेअरमन, व्हा. चेअरमन यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
नुतन चेअरमन अशोक काशिनाथ चराटी यांनी सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने अण्णा भाऊ व त्यांच्या संस्थापक सहकाऱ्यांनी आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार पारदर्शक व्यवहार करुन बँकेचा नाव लौकीक वाढविणेसाठी सर्व संचालकांना विश्वासात घेवून काम करणार असलेचे सांगून बँकेच्या प्रगतीच्या दृष्टीने प्रयत्न करणार असून बँकेला शेड्युल दर्जा प्राप्त करुन देण्याबद्दल प्रयत्न करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले.
व्हाईस चेअरमन संजय विष्णू चव्हाण यांनी संचालकांनी सोपविलेली जबाबदारी सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पाडू अशी याप्रसंगी ग्वाही दिली. तसेच बँकेच्या संचालक मंडळाने बँकेची प्रगती करणेसाठी आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी बँकेच्या नूतन संचालक किशोर भुसारी, बसवराज महाळक, आनंदा फडके, श्रीमती शैला टोपले, विजयकुमार पाटील, जयवंत खराडे, डॉ. सुनील देशपांडे, विनय सबनीस, डॉ. सागर कुरुणकर, हृषिकेश सातोसकर, सिद्धेश नाईक, श्रीमती संध्याताई वाटवे, सौ. कुंदा डांग, किरण पाटील, अशोक पाटील, कान्होबा माळवे, उपस्थित होते. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी नुतन चेअरमन, व्हा. चेअरमन व सर्व नूतन संचालकांचे बँकेच्या वतीने स्वागत करून अभिनंदन केले. यावेळी प्रशासन व बोर्ड विभागाचे मुख्याधिकारी श्री. नितीन बेल्लद उपस्थित होते.
