🛑राजमाता जिजाऊ फौंडेशन
संचलीत ( श्री . छत्रपती युवा ग्रुप – उत्तूर ) संयुक्त शिवजयंती सोहळा – २०२६ – नूतन कार्यकारिणी जाहीर.
🛑श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर व्याख्यानमाला पुष्प दुसरे वक्ते – डॉ. विश्वास बापट ‘वनस्पती: बहुमुल्य, बहुगुणी वरदान’
🛑श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर व्याख्यानमाला पुष्प दुसरे वक्ते – डॉ. विश्वास बापट ‘वनस्पती: बहुमुल्य, बहुगुणी वरदान’.
आजरा.- प्रतिनिधी

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा यांच्यावतीने आयोजित व्याख्यानमालेत जैवतंत्रज्ञान शास्त्रज्ञ डॉ. विश्वास बापट यांचे ‘वनस्पती: बहुमुल्य, बहुगुणी वरदान’या विषयावरील व्याख्यान झाले. डॉ. बापट म्हणाले मनुष्यासह संपूर्ण प्राणीसृष्टी वनस्पतींवर अवलंबून आहे त्यामुळे आपल्या जीवनात वनस्पतींना अनन्यसाधारण महत्व आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजाही वनस्पतींशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. ऑक्सीजन देण्याचे व प्रदुषण शोषून घेण्याचे महत्वपूर्ण कार्य वनस्पतीच करतात त्यामुळे वनस्पतींना देव मानले तर वावगे होणार नाही संत तुकाराम महाराजांनी वृक्ष वेलींना आपले सगे सोयरे मानले आहे. सिध्दार्थ गौतम बुध्दांनी बोधिवृक्षाखाली ध्यानधारणा करून आत्मप्राती साध्य केली.
अन्नधान्ये, फळे, भाज्या, मसाले, या सर्व बाबी वनस्पतीच देतात. आयुर्वेदिक औषधांपासून आधुनिक औषधांपर्यंत सर्व उपचारात वनस्पतींचा उपयोग केला जातो वनस्पतीमुळेच पर्जन्यमान होते आणि जमिनीची धूपही थांबते. जंगलात तर अनेक जिवांचे अन्न आणि निवारा वनस्पतीच असतात. वनस्पतींच्या विविध प्रजाती आणि त्यांचा उपयोग याबाबत त्यांनी चित्रफितींच्या माध्यमातून माहिती दिली.
डॉ. ओ. डी. शिंदे इंजिनिअरींग कॉलज चे प्राचार्य डॉ. दिनकर घेवडे प्रमुख उपस्थीत होते. अध्यक्षस्थानी वाचनालयाच्या उपाध्यक्षा सौ. विद्या हरेर होत्या शिवसहयाद्री चॅरीटोबल फाऊंडेशन पुणे यांच्या सौजन्याने वाचनालयाच्यावतीने देण्यात येणाऱ्या माता गौरव पुस्काराचे वितरणही यावेळी करण्यात आले. श्रीमती सरीता समीर घेवडे, भटवाडी, ता. आजरा यांना सौ विद्या हरेर यांच्याहस्ते शाल, साडीचोळी, सन्मानपत्र, ग्रंथभेट व रोख दोन हजार पाचशे रूपये देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला मुकुंददादा देसाई, संभाजीराव सावंत, शिवाजीराव पाटील, विजय बांदेकर, महादेव पोवार, संदिप वाटवे, राजश्री गाडगीळ, उज्वला गुंजकर, शर्मिला सातोसकर, रमा केळकर, डॉ. अंजनी देशपांडे, डॉ. गौरी भोसले, रविंद्र हुक्केरी, संभाजीराव इंजल, बंडोपंत चव्हाण, सुभाष विभुते, महंमदअली मुजावर, विनायक आमणगी, गीता पोतदार, सुचेता गडडी ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर यासह मोठ्या प्रमाणावर आजरेकर रसिक श्रोते उपस्थीत होते. कार्यवाह कुंडलिक नावलकर यांनी पाहुण्यांचा परीचय करून दिला गिता पोतदार यांनी सुत्रसंचालन केले तर विनायक आमणगी यांनी आभार मानले.

🛑राजमाता जिजाऊ फौंडेशन
संचलीत ( श्री . छत्रपती युवा ग्रुप – उत्तूर ) संयुक्त शिवजयंती सोहळा – २०२६ – नूतन कार्यकारिणी जाहीर.
उत्तुर – वार्ताहर.

राजमाता जिजाऊ फौंडेशन संचलीत ( श्री . छत्रपती युवा ग्रुप उत्तूर ) संयुक्त शिवजयंती सोहळा – २०२६ – नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली २०२६ ची कार्यकरणी दि. ४ रोजी बैठक बोलण्यात आली होती. या बैठकीत एकमताने अध्यक्ष पदी – आयुष प्रवीण जवाहीरे, उपाध्यक्ष पदी-विनायक तानाजी कातोरे सचिव – विनायक बाळासो जवाहीरे, खजिनदार-अवधुत दिनकर कुंभार, प्रसिद्धी प्रमुख शुभम बाळकृष्ण तिबीले, संपर्क प्रमुख – स्वप्नील विलास खोत तसेच राजमाता जिजाऊ फाउंडेशन चे अष्टप्रधाण मंडळ
जाहीर केले. यामध्ये तुषार घोरपडे, राजेंद्र भोसले, सौरभ कुरूणकर, विश्वनाथ हसबे, रोहीत कुरूणकर, आकाश पोरलेकर , दिलावर लाटवाले, विशाल उत्तूरकर अशा निवडी करण्यात आल्या. या ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष योगेश भाईगडे व ग्रुपचे मागील वर्षाचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ, व हितचीतक उपस्थित होते. यावेळी सूरज रक्ताडे यांनी स्वागत केले तर सागर येसादे यांनी आभार मानले.
