🛑आजरा साखरवर लायन्स क्लब गडहिंग्लज वतीने वाहनांना रिफ्लेक्टर वाटप.
🛑आजरा हायस्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलनाला क्रीडा स्पर्धेने प्रारंभ.
🛑आजरा साखरवर लायन्स क्लब गडहिंग्लज वतीने वाहनांना रिफ्लेक्टर वाटप.
आजरा :- प्रतिनिधी.

वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे तसेच क्लबच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत लायन्स क्लब गडहिंग्लज तर्फे वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर ट्रॅक्टर, छकडी व ट्रक या वाहनासाठी रिफ्लेक्टर वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. लायन्स क्लब गडहिंग्लजची स्थापना सन. १९७६ मध्ये झाली आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण आणि वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपत विधायक कार्य म्हणून क्लब तर्फे आजरा साखर कारखान्यावर वाहनासाठी रिफ्लेक्टर वाटप करण्यात आले. लायन्स क्लब ही आंतरराष्ट्रीय संघटना जवळ जवळ २१४ देशात कार्यरत आहे. गडहिंग्लजमध्ये लायन्स क्लब तर्फे एक रक्त पेढीसुद्धा चालवली जाते. वृक्षरोपण तसेच इतर अनेक विधायक कार्यात लायन्स क्लब अग्रेसर असून माजी प्रांतपाल लायन अण्णासाहेब गळतगे यांचे मार्गदर्शनाखाली कायमस्वरूपी गेली २५ वर्षे कायमस्वरूपी हा प्रकल्प अविरतपणे सुरु असलेबाबत गडहिंग्लज लायन्स क्लबचे अध्यक्ष विनायक गळतगे यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले.
यावेळी लायन कळगोंडा पाटील, लायन राजेंद्र वडगुले यांच्यासह कारखान्याचे कार्यकारी संचालक एस.के.सावंत, मुख्यशेतीअधिकारी विक्रमसिंह देसाई, ऊसपुरवठा अधिकारी अजित उर्फ राजू देसाई, शेतीविभागचे मुख्य क्लार्क संदीप कांबळे, केनयार्ड सुपरवायझर तुकाराम मोळे तसेच शेती – केनयार्ड चे कर्मचारी व वाहतूकदार उपस्थित होते.

🛑आजरा हायस्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलनाला क्रीडा स्पर्धेने प्रारंभ.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील जनता शिक्षण संस्था संचलित आजरा हायस्कूल आजरा येथे दि ३ रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाला सुरुवात झाली असून या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेने संस्थेचे उपाध्यक्ष विलास नाईक यांच्या हस्ते ध्वज पूजन व ध्वजारोहणाने झाली सामूहिक राष्ट्रगीत सादर झाले शाळेची खेळाडू कुमारी दीपा गोपाळ नाईक हिने क्रीडा प्रतिज्ञा दिली मैदान पूजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे यांच्या हस्ते तर क्रीडा ज्योत प्रज्वलन संचालक डॉ. दीपक सातोस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच बालिका दिनानिमित्त क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक ए एल तोडकर यांनी कार्यक्रमाची स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी आजरा हायस्कूल माजी विद्यार्थिनी विमा खवरे धनश्री खवरे व पालक जयसिंग खरे यांनी शाळेच्या क्रीडा विभागासाठी क्रीडा साहित्य भेट दिल्याबद्दल तसेच आजारातील नामांकित केमिस्ट सुरजकुमार नार्वेकर यांनी शाळेसाठी प्रत्येक वर्षी प्रथमोपचार साहित्य भेट दिल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून एम एस मोरे सौ एम पी चव्हाण यांनी तसेच गुणलेखक संघ व्यवस्थापक म्हणून सर्व शिक्षकांनी मदत केली यावेळी संस्थेचे सर्व संचालक सल्लागार माजी मुख्याध्यापक विद्यमान मुख्याध्यापक उप मुख्याध्यापक पर्यसेवक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. ए. पोतदार यांनी केले तर आभार उपमुख्याधिका सौ एच. एच. कामत यांनी मानले.
