प्रथमेश नगरात वाढीव पाण्याचा पाईपलाईन कामाचा उद्घाटन सोहळा संपन्न.- चंदगड नगरपंचायत.
चंदगड. प्रतिनिधी.
चंदगड येथील नगरपंचायत हद्दीतील प्रथमेश नगर येथे वाडी पाण्याच्या पाईपलाईनचे उद्घाटन सोहळा दि. २६ रोजी संपन्न झाला.
चंदगड नगरपंचायतच्या नगराध्यक्षा प्राची कानेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती नगरसेविका मुमताजबी सुलेमान यांच्या हस्ते सदर कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी चंदगड नगरपंचायत चे मुख्याधिकारी विरोधी पक्षनेते सर्व नगरसेवक उपस्थित होते.
प्रथमेश नगर मध्ये नवीन पाईप लाईन कामामुळे नागरिकांच्या मध्ये समाधान व्यक्त होत आहे.
