भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युसुफ पठाणने क्रिकेटमधून घेतली निवृत्ती.
नवी दिल्ली वृत्तसंस्था.
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युसुफ पठाणने सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे शुक्रवारी (२६ फेब्रुवारी) जाहीर केले आहे. त्याने ट्विटवर प्रसिद्धी पत्रक जाहीर करत त्याच्या निवृत्तीची घोषणा केली आहे.
युसुफ २००७ टी२० विश्वचषक आणि २०११ च्या वनडे विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग राहिला आहे. विशेष म्हणजे त्याने २००७ च्या टी२० विश्वचषकातील अंतिम सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
