योग्य निवड.- श्री लक्ष्मी वि. का. स. (विकास ) सेवा संस्थेच्या चेअरमन पदी जयवंत मसणू सुतार यांची नियुक्ती.
आजरा.- प्रतिनिधी.
श्री लक्ष्मी वि. का. स. (विकास )सेवा संस्था मर्यादित किणे या संस्थेच्या रिक्त झालेल्या चेअरमन निवड सभेच्या अध्यक्ष स्थानी अध्यासी अधिकारी मा. पी व्ही फडणीस सहाय्यक निबंधक कार्यालय आजरा हे होते. यावेळी चेअरमन पदी जयवंत मसणू सुतार यांचे नाव मनोहर दत्तू पताडे यांनी सुचविले त्यास गोविंदा सुभाना वांजोळे यानी अनुमोदन दिले.


यावेळी अध्यक्ष व नूतन चेअरमन याचा सत्कार करणेत आला. यावेळी व्हा. चेअरमन आप्पा गुरव संचालक आनंदा कामत, श्रीकांत शेंदरकर, मारूती गिलबिले, चाळू केसरकर, गंगाराम पाटील, जनाबाई गिलबिले, सुशाबाई तुपट उपस्थित होते आभार सचिव संजय घाटगे यांनी मानले.

