भादवणचे सुपुत्र बृहन्मुंबईचे मुख्य अभियंता.- चंद्रकांत उंडगे यांच्या नियुक्तीने पंचक्रोशीत आनंद.
आजरा.- प्रतिनिधी.
भादवण ता. आजरा चे सुपुत्र चंद्रकांत लक्ष्मण उंडगे यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्वोच्च अशा मुख्य अभियंता पदावर नियुकी करण्यात आली आहे. पा नियुक्तीमुळे संपूर्ण भादवण पंचक्रोशीत व मुंबई महानगरात समाधान व अभिमान व्यक्त केला जात आहे. कठोर परिश्रम, प्रामाणिक सेवा आणि प्रशासकीय अनुभवाच्या बाळावर श्री. उंडगे यांनी हे पद मिळाले आहे. महानगरपालिकेतील सुमारे ३१ वर्षाच्या प्रदीर्ष सेवाकाळात मागील १५ वर्षात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असताना विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या
पाडल्या आहेत. विशेष म्हणजे आजपर्यंत सर्वच आयुकांकडे विशेष कार्य अधिकारी (ओएम) महणून काम पाहिले आहे.
महानगरपालिकेतील प्रशासकीय कामकाज, विकास प्रकल्पांचे नियोजन, तांत्रिक अंमलबजावणी आणि समन्वय या क्षेत्रांत त्यांचा अनुभव दांडगा मानला जातो. त्यांच्या विर्णयक्षमतेमुळे प्रमाणे पूर्ण होण्यास मदत झाली आहे.

मुख्य अभियंता जबाबदारी स्वीकारल्यानंतर मुंबईतील पायाभूत सुविधा, नागरी विकास, रस्ते, जलनिस्सारण आणि इतर महत्वाच्या प्रकल्पांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा केली जात आहे. त्यांच्या या यशामुळे भादवण गावात ग्रामीण भागातील तरुणांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे. ग्रामस्थ, सहकती अधिकारी आणि मुंबईकरांकडून त्यांचे अभिनंदन होत असून, पुढील कार्यकाजासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

