गडहिंग्लज. प्रतिनिधी.
कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली कोब्रा कमांडो मुलगी. पूजेची सवय असणाऱ्या भारतीयांना विशेषतः हिंदू ना श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्तींचा उदो उदो करण्यामध्ये धन्यता वाटते . पण काही गरिबीतून वर आलेले चमकते तारे हे सार्यांनाच आकर्षित करतात .एका शेतकरी कुटुंबातील कोल्हापूर जिल्ह्यातील कन्या सीआरपीएफ मध्ये दाखल झाली. पहिल्यांदाच कॉब्रा कमांडो बटालीयन तयार होते आणि त्यात ती यशस्वी ट्रेनिंग पूर्ण करते याची गंधवार्ताहि मेडियाला नाही.
22 वर्षाची पूजा अरविंद चव्हाण ही गडहिंग्लज जवळच्या मत्तीवडे गावची. चार हजार वस्तीचे छोटं गाव. गडिंग्लज पासून बारा-तेरा किलोमीटरवर आहे पूजाचे वडील अरविंद हा अलीकडेच कर्करोगाने वारला .शेती हे उपजीविकेचे त्या घराचे साधन . अरविंदने पूजाला एकदा वृत्तपत्रात सीआरपीएफ या भरतीची जाहिरात दाखवली आणि यासाठी प्रयत्न कर म्हणून सांगितले. तिने जोरदार तयारी केली आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये ती भरती झाली इंग्रजी विषय घेऊन पदवी उत्तीर्ण झालेल्या पूजाने २०१७ला निवड झाल्यावर अजमेरला जवळजवळ वर्षाचे ट्रेनिंग पूर्ण केले.
कठोर परिश्रमाने ती रिवाल्वर ,रायफल, कार्बाइन, एल एम जी बाॅंब फोडणे अशा अनेक गोष्टी शिकली आहे 200 मुली पैकी पाच जणींची कोब्रा कमांडो साठी निवड झाली त्यात पूजा चा नंबर लागला. पाच महिन्याच्या ट्रेनिंग नंतर आता ती छत्तीसगड किंवा गडचिरोली कडे रवाना होईल
तिच्याशी बोलताना असे जाणवते की आता खेड्यातली मुलगी राहिली नसून एक आत्मविश्वास, लढाईची पूर्ण तयारी असलेली, कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी सज्ज असलेली एक तरुणी आहे तिला पाहताना ति ती इतकी किरकोळ वाटते की ती कोब्रा कमांडो आहे असं म्हटलं तर कोणाला खरं वाटणार नाही .मात्र ती आपल्या या यशाबद्दल नम्र आहे. सुट्टीवर गावी आल्यावर कोल्हापूर जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळाला ती आपल्या स्कूटरवरून सुसाट सुटली आहे आणि निसर्गाचा मुक्तपणे आनंद लुटत आहे अशा कोब्रा कमांडो मुली महाराष्ट्रामध्ये अधिकाधिक तयार व्हायला हव्यात. पूजा तुझ्या भावी आयुष्याला सर्व मराठी बांधवांच्या शुभेच्छा
डॉ. सुभाष देसाई कोल्हापूर
