माकप अधिवेशन निमित्ताने, परिवर्तन पदयात्रे साठी सज्ज व्हा.- काँ. अतूल दिघे.
आजरा.- प्रतिनिधी.
भारताचा कम्यूनिष्ठ पक्ष( मार्क्सवादी लेनिनवादी ) या पक्षाचे कोल्हापूर येथे डिसेंबर दिनांक २०व २१ रोजी अधिवेशन होत असून या अधिवेशन निमित्ताने शनिवारी २० रोजी दसरा मैदानातून परीवर्तन पद यात्रामधून शासनाला गिरणी कामगार व पेन्शर्नाची ताकद दाखवून देण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहाणेचे आवाहन. आजरा येथील किसान भवन मध्ये झालेल्या गिरणी कामगार सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून काँ. अतूल दिघे यांनी केले.
प्रास्ताविक नारायण भंडागे यांनी केले. दिघे यांनी बोलताना गिरणी कामगारांचे योगदान या राज्यात मोठे असून मुबंई महाराष्ट्र मिळवण्यासाठी अधिकसंख्येने गिरणी कामगार हुतात्मे झाले. गिरणी कामगारांना मुबंईत गिरणीच्या जागेत घरे मिळाली पाहिजे या चळवळी साठी कोल्हापूर जिल्हाचे मोठे योगदान असून या जिल्ह्यात गिरणी कामगाराची मोठी ताकत आहे हे दाखवण्यासाठी येणार्या पंचायत समिती निवडणूक लढवण्यासाठी गिरणी कामगारानी तयारी करावी असे सांगितले.

यावेळी आप्पा कुलकर्णी यांनी पेन्शन वाढीव मिळण्यासाठी कायदेशीर लढाई पूर्ण झाली असून शासन जनतेची दिशाभूल करीत आहे. किमान नऊ हजार पेन्शन दिली पाहिजे, यासाठी कोल्हापूर येथील अधिवेशनात देश पातळीवरील मार्गदर्शक येणार असेलेचे सांगितले. काँ. शांताराम पाटील यांनी निवडणूक जवळ आल्या कि राजकीय नेत्यांना गिरणी कामगारांची आठवण येते प्रत्यक्षात गिरणी कामगाराचे प्रश्न सोडवायला कोण तयार नाहीत. यासाठी मुबंईत घर आणी वाढीव पेन्शन मिळण्यासाठी पदयात्रेत सहभागी होणार असेले सांगितले. यावेळी महादेव होडगे, गोपाळ रेडेकर, संजय घाटगे यानी मनोगत व्यक्त केले. यावेळी नारायण राणे, समाजसेवक नरसू शिंदे, शिवाजी पोवार, लक्ष्मण बामणे, निवृती मिसाळे, नंदा वास्कर, अनिता बागवे, सजाबाई देसाई, जिजाबाई वांजोळे, मनपा बोलके, शांताराम हारेर, याच्यासह गिरणी कामगार व वारस उपस्थित होते आभार काशिनाथ मोरे यानी मानले.

