मलिग्रे शाळा सर्व क्षेत्रात, ऊत्कृट असेलेचे समाधान. – मुख्याध्यापिका मनिषा सुतार.
आजरा . – प्रतिनिधी.

मलिग्रे येथील महात्मा जोतिबा फुले या नावाची प्राथमिक मराठी शाळा सर्व सोयीनीयुक्त असून, येथील पालक व ग्रामस्थ सजक, जागृत असल्याने या शाळेच्या मुलांचा बुध्यांक चांगला असलेचा व लोक सहभागातून शाळेचा परीसर व खुले मैदान प्रेरणादायी असल्याने, ही शाळा सर्व क्षेत्रात ऊत्कृट असल्याने मत मुख्याध्यापक मनिषा सुतार यांनी त्याच्या बदली निमित्ताने आयोजित केलेल्या सदिच्छा समिरंभात व्यक्त केले. अध्यक्ष स्थानी भाजप मुंबईचे कार्यकर्ते गणपती भणगे होते. सुरवातीला सावित्रीबाई फुले याच्या फोटोचे पुजन करण्यात आले.
सुतार यानी पुढे बोलताना या शाळेत मी २०१८ साली हजर झाले, त्यावेळी ऊत्तूर मलिग्रे हे अंतर लांब असल्यामुळे सुरूवाती पासून बदलीसाठी प्रयत्न करत होते, परंतू या शाळेसाठी असणारा लोकांचा सहभाग, पालकांची तळमळ आणी सृजनशिल विध्यार्थी व शाळेचा परीसर यात असणारी आपलेपणाची भावना आणी विध्यार्थ्याचे प्रेम आदर पाहून या शाळेत सात वर्षे शासकीय उपक्रम व स्पर्धा परीक्षा च्या माध्यमातून तसेच कोरवी मँडम याच्या सहकार्याने सेवा केली. मला या गावातून खूपच प्रेरणा मिळाल्याचे त्यानी सांगितले. यावेळी बदली निमित्ताने त्याचा सत्कार शाळा व्यवस्थापक कमिटी अध्यक्षा सविता कागिणकर याच्या हस्ते केला तर नविन हजर झालेल्या शिक्षीका वैशाली जोशिलकर याचे स्वागत करण्यात आले. यावेळी माझी सरपंच समीर पारदे, अशोक शिंदे, संजय घाटगे, शिवाजी भगुत्रे, मारूती ईक्के यानी मनोगत व्यक्त केली. यानंतर मनिषा सुतार यानी मराठी शाळेच्या नावाचा बोर्ड, अंगणवाडीच्या मुलांना पाळणे सर्व विध्यार्थ्यांना टोप्या देणगीरूपाने देऊन, मुलाना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी उपसरपंच चाळू केंगारे, अंगणवाडी सेविका शशिकला घोरपडे, सुनिता लोहार, पूर्वा देशपांडे, नंदा बुगडे, शितल बुगडे,शोभा बुगडे,मंगल पारदे, रेश्मा चौगुले, शिवानंद आसबे, रणजीत बुगडे, संदीप भगूत्रे, विश्वास बुगडे, बाळू कांबळे, शंकर बुगडे याच्यासह मराठी शाळा पालक उपस्थिती होते. सुत्रसंचालन व आभार नुतन मुख्याध्यापीका कल्पना कोरवी यानी मानले.
