गवसेतील – प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर्स व स्टाफ उपलब्ध का.? नाहीत. शिवसेना उबाठाचे – तालुका आरोग्य अधिकारी, यांना निवेदन.
आजरा – प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील गवसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर्स व स्टाफ उपलब्ध नसलेबाबत.तालुका आरोग्य अधिकारी, आजरा यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
गवसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत बांधकाम करुन एक वर्ष पूर्ण झाले परंतू अजुनही त्या ठिकाणी डॉक्टर्स व इतर कर्मचारी उपलब्ध नाहीत. यामुळे या भागातील नागरिकांना वैद्यकीय सेवा मिळत नाही. यासाठी उद्या दि. ५/१२/२०२५ रोजी दुपारी १२ वाजता गवसे प्राथमिक आरोग्य केंद्र गवसे येथे या संदर्भात माहिती देण्यासाठी हजर रहावे ही नम्र विनंती. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर संभाजी पाटील (उपजिल्हाप्रमुख), युवराज पोवार (तालुका प्रमुख), अमित गुरव (युवा सेना उप तालुका प्रमुख) दिनेश कांबळे (शेतकरी सेना तालुका अध्यक्ष)
युवराज पोवार (तालुका प्रमुख) महेश पाटील (युवा सेना उप जिल्हा प्रमुख) चंद्रकांत व्हरकटे (शिवसेना उप तालुका संघटक),रवि सावत शाखा प्रमुख, वाहतूक सेना राजू बंडगर यांच्या सह्या आहेत. ( याबाबत शुक्रवारी आरोग्य विभागाने बैठकीचे आयोजन केले असल्याचे समजते.)
