कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., कोल्हापुर – वतीने ( मडिलगेत विविध योजना बाबत मार्गदर्शक मेळावा.)
आजरा.- प्रतिनिधी.

जिल्हा बँकेच्या विविध योजनांची माहिती खातेदार व सभासदांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नाम. हसन मुश्रीफ त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई त्यांच्या व आजरा तालुका जिल्हा बँक शाखेच्या वतीने जिल्हा बँकेच्या योजना सर्वांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शक मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. या अनुषंगाने मडिलगे ता. आजरा येथे मंगळवार दि. २/१२/२०२५ रोजी मार्गदर्शक मेळावा संपन्न झाला. अध्यक्षस्थानी माजी सभापती भिकाजी गुरव होते. स्वागत व प्रस्ताविक सरपंच बापू निऊगरे यांनी केले. यावेळी जिल्हा बँकेची माहिती बँक निरीक्षक विजय सरदेसाई, व एल.सी प्रमुख विजय कुंभार यांनी सभासद, ग्रामस्थ, खातेदार यांना माहिती दिली.
💥माहिती दिलेली पुढीलप्रमाणे.
आर्थिक व डिजीटल साक्षरता कार्यक्रमामध्ये घ्यावयाचे गुपवाईज विषय, आर्थिक साक्षरतेमध्ये नव्याने समाविष्ट होणाऱ्या प्रौढ लोकांसाठी कार्यक्रम (Programme (अ) for Adults)
उत्पन्न, खर्च व काटकसरीचे अंदाजपत्रक बचत, पत व ऋण व्यवस्थापन, विमा (जीवन विमा आणि अन्य वीमा, पुडती विमा)
गुंतवणूक, आर्थिक नियोजन, (अवास्तव खर्च थांबविणे, पैसे वाचविणे, बँकेमध्ये पैसे जमा करणे), निवृत्ती वे निवृत्तीवेतन,
केंद्र शासनाच्या प्रायोजित योजना (प्रधानमंत्री जनधन योजना / प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना /प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना / अटल पेन्शन योजना), फसवणुकीपासून संरक्षण (सुरक्षित डिजीटल बँकिंगच्या अनुभवास्तठी.), तक्रार निवारण बैंक विमा व पेन्शन संबंधित, जोखीम विरुध्द परतावा., अनधिकृत इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारासंबंधी ग्राहकाचे वायित्व / जबाबदारी, अशा (१२) योजना

💥 किसान क्रेडिट कार्ड योजना.
शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम (Programme for Farmers), रुपे किसान कार्ड कसे व का वापरावे आणि त्यांचे फायदे, पीक विमा प्रधानमंत्री पीक बीमा योजना (PMFBY)
पीक कर्जाची त्वरीत परतफेड., व्याज परतावा योजना, विमा योजना (जीवनविमा व अन्य), पेन्शन योजना, फसवणुकीपासून संरक्षण (सुरक्षित डिजीटल बँकिंगच्या अनुभवासाठी.)
तक्रार निवारण – बँक, विमा व पेन्शन यांचे संबंधित, जोखीम विरुध्द परतावा. तसेच
💥अनधिकृत इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारासंबंधी ग्राहाकंची दायित्व / जवाबदारी.
शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम (Programme for School children) अपेक्षित गरज (असलेच पाहिजे व असणे चांगले आहे) गरज विरुध्द इच्छा / मागणी
⭕अंदाजपत्रक. – बँकेची ओळख – सेव्हिंग खाते, चालु खाते, रिकरिंग ठेव, मुदतबंद ठेव, विविध कर्जप्रकार – पीक कर्ज, व्यक्तीगत कर्ज, घरबांधणी कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज इ., विमा संबंधि ओळख (माहिती), पेन्शन संबंधी ओळख (माहिती)
फसवणुकीपासून संरक्षण (सुरक्षित डिजीटल बँकिंगच्या अनुभवासाठी.)
💥तक्रार निवारण – बैंक विमा व पेन्शन संबंधित., जोखीम विरुध्द परतावा.
अनधिकृत इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारासंबंधी ग्राहकाचे दायित्व / जबाबदारी, जेष्ठ नागरीकांसाठी कार्यक्रम (Programme for Senior Citizens)
पॉन्झी / फसव्या योजनांपासून घेणेच्या दक्षता. (फसव्या योजनाची लक्षणे व घोटाळे) (१)
घोटाळयांबाबत नियामक व्यक्तीस अहवाल सादर करा.
३तक्रार निवारण – बँकेकडे आणि बैंकिंग लोकपाल यांचेबरोबर तक्रार कशा प्रकारे दाखल करावी,, निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी योग्य गुंतवणूक योजना., वयस्कर /आजारी/असमर्थ व्यक्तीसाठी बँकिंगचे व्यवहार., फसवणूकी पासून संरक्षण (सुरक्षित डिजीटल बँकिंगच्या अनुभवासाठी., तक्रार निवारण – बैंक, विमा व पेन्शन संबंधित., जोखीम विरुध्द परतावा, अनधिकृत इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारासंबंधी ग्राहकाचे दायित्व, व्यावसायिकांसाठी कार्यक्रम. (Programme for Entrepreneurs), उद्योग सुरु करणेसाठीच्या निधीसाठी तुम्हांस कोण निर्देशीत करेल.
कर्ज मागणी प्रक्रिया कशी करावी, तारण, सहतारण व हमी.
🟣कोल्हापुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., कोल्हापुर
व्यक्तिगत कर्ज / २०२५-२०२६/६४७
परिपत्रक
दिनांक :- १५/१०/२०२५
विषय :- धवलक्रांती योजनेअंतर्गत परराज्यातील म्हैस खरेदी कर्ज धोरणबाबत,
सर्व संबधिताना कळविणेत येते की. जिल्हयातील अल्पभुधारक व भूमीहीन शेतमजुरांना परराज्यातील जातीवंत म्हैस खरेदी करणेकरिता महाराष्ट्र शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, बसंतराव नाईक विमुक्त जाती य भटक्या जमाती विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ व संत रोहिदास चोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या १२% व्याज परतावा व व्यान्न अनुदान कर्ज योजनेअंतर्गत परराज्यातील म्हस खरेदी करणेकरिता मा. संचालक मंडळ सभा ४.नं.५६ दि.२८/०६/२०२१ ने कोल्हापुर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्या., कोल्हापुर (गोकुळ) त्र श्री. तात्यासाहेब कोरे बारणा सहकारी युध उत्पादक संघ मर्या., बारणानगर (वारणा) यांच्या हमीवर परराज्यातील हेस खरेदीसाठी कर्ज पुरवठा करणेचे धोरण मंजुर करणेत आले आहे. तथापि महामंडळा कडुन व्याज परतावासाठी पात्रता प्रमाणपत्र (L.O.I.) देणेसाठी वेळ होत असलेने व विलंबाने व्याज परतावा प्राप्त होत असलेने कर्जदाराकडुन तात्काळ कर्ज मिळणेकरिता या धोरणाव्यतिरिक्त परराज्यातील जातीवंत म्हैस खरेदी करणेकरिता कर्जाची मागणी होत असलेने मा. संचालक मंडळ सभा ठ.नं.२२ दि.२९/०९/२०२५ र्न परराज्यातील २ म्हैस खरेदीफरिता धवलक्रांती मध्यम मुदत फर्ज धोरण मंजुर करणेत आले आहे. त्याचे निकष खालील प्रमाणे १) उद्देश:-
⭕अल्पभुधारक व भूमीहीन शेतमजुरांना परराज्यातील जातीवंत म्हैस खरेदी करणेसाठी आर्थिक भांडवल उपलब्ध करुन देणे.

२) पात्रता:-
१) कर्ज मागणीदार कोल्हापूर जिल्हयातील रहिवाशी असावा.
२) कर्ज मागणीदार बँकेचा खातेदार असावा.
३) कर्जमागणीदार यांच्या मालकीची स्थावर मिळकत असावी. जर कर्जमागणीदाराकडे स्थावर मिळकत नसलेस कुटुंबातील स्थावर मिळकत असलेली अन्य व्यक्ती (आई, वडिल, भाऊ, बहिण इ.)
सहकर्जमागणीदार असेल, सदर व्यक्ती कोल्हापुर जिल्ह्यातील रहिवाशी व बँकेची खातेदार असावी.
४) कर्जमागणीदार हा हमी देणान्या दुधसंस्थेचा उत्पादक सभासद असावा.
५) कर्जमागणीदार व सहकर्जमागणीदार कोणत्याही बँकेचा, विकास सेवा संस्थेचा, दुध संस्थेचा व इतर
⭕वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
३) स्वगुंतवणूक :- कर्जमागणीदार यांनी १०% स्वगुंतवणूक करणेची आहे.
४) कर्ज मर्यादा :-बँकेच्या युनिट कॉस्ट दरातून १०% स्वगुंतवणूक वजा जाता शिल्ल्क राहणारी रक्कम कर्ज मर्यादा राहील.
५) व्याजदर :- सदर कर्जाचा सध्याचा व्याजदर द.सा.द.शे. १२% (मासिक व्याज आकारणी) राहिल. कर्जाचा हप्ता थकीत गेलेस थकीत रक्कमेवर जादा २% दंड व्याज आकारणेत येईल. कर्जाचा हप्ता समान मासिक पध्दतीने (B.M.I.) आकारणेत येईल. तसेच व्याजदरात बदल करणेचा अधिकार बँकेस राहिल.
६) कर्जपरतफेड मुदत :-
३ ते ५ वर्ष राहिल.
७) तारण:- कर्जमागणीदार व सहकर्जमागणीदार यांचे मालकीची स्थावर मिळकत तारण घेणेत येईल.
८) इतर निकष
१) हमी ठराव देणारी दूध संस्था ही जिल्हा बँकेची पात्र सभासद असली पाहिजे.
२) सदर हमी देणारी दूध संस्था संबंधित दूध संघाशी संलग्न असली पाहिजे.
३) कर्जमागणीदार, सहकर्जमागणीदार, जामिनदार यांनी बँकेचे व वर्ग सभासद होणेचे आहे.
४) सदर कर्जाकरिता हमी ठराव देणाऱ्या दुधसंस्थेचे २ दुध उत्पादक सभासद जामिनदार देणेचे असुन, सदर जामिनदार जिल्हयातील रहिवाशी व बँकेचे खातेदार असावेत.
५) हमी दिलेल्या दूध संस्थेचा कर्जमागणीदार थकबाकीत गेलेस थकीत कर्जवसुलीसाठी संबंधित दूध संस्थेच्या बँकेकडे असलेल्या सर्वप्रकारच्या ठेव खात्यातुन थकीत कर्जहप्ता वसुल करणेचा अधिकार बँकेस राहिल तसेच अशा कोल्हापूर जिल्ह्या बँकेच्या विविध योजना व नियम अटी पात्र लाभार्थी सभासद यांना माहिती देण्यात आली. यावेळी विविध सेवा संस्था व दुसंस्थेचे चेअरमन सभासद, मडिलगे गावातील जिल्हा बँकेचे खातेदार, लाडक्या बहिणी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच श्री निऊगरे सर्वांचे आभार मानले

चौकट.
( यावेळी उपस्थित नागरिकांनी, खातेदारांनी आपल्या जिल्हा बँकेच्या योजना चांगल्या आहेत परंतु कर्ज प्रकरण करताना अनेक वेगवेगळ्या कागदपत्रांची मागणी केली जाते. व हेलपाटे मारावे लागतात. काही वेळा कागदपत्रे योग्य असताना देखील अनेक वेगवेगळे कागदपत्रे पुन्हा मागितली जातात. तीच कागदपत्रे वेगळ्या बँकेत दिल्यास कर्ज प्रकरण मंजूर होतं. यामध्ये बदल होऊन ग्राहकांना चांगली सेवा मिळावी आपल्या योजना चांगल्या असल्याचे कौतुक केले.)
