आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीत – अपक्ष उमेदवार शाहीन तकिलदार – टेबल चिन्हाला मतदान करा.. प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर पक्ष उमेदवार शाहीन तखिलदार प्रभाग क्रमांक ६ प्रचाराचा जोर अधिक वाढवला असून, मतदारापर्यंत थेट पोहोचण्याच्या दृष्टीने विविध सर्वच प्रभागात घरोघरी संपर्क मोहीमा राबविण्यात येत आहेत. त्यानुसार, अनेक प्रभागातील मतदारांनी पाणीपुरवठा, गटारव्यवस्था, रस्ते दुरुस्ती, महिलांसाठी सुविधा, तसेच तरुणांना रोजगाराभिमुख उपक्रम सुरू करण्याच्या मागण्या उमेदवारांसमोर मांडत आहेत. तकीलदार कॉलनी मध्ये अकरा वर्षापासून पिण्याचे पाणी नाही. रस्ते गटर्स नाहीत. या प्रभागाकडे नगरपंचायतचे दुर्लक्ष झाले आहे.

मी सर्व समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन देत पारदर्शक, विकासाभिमुख कारभार करण्याचे आश्वासन दिले.
प्रभागात उत्स्फूर्त प्रतिसाद.

प्रचारादरम्यान स्थानिक नागरिकांमध्ये निवडणुकीबाबत जागरूकता निर्माण करण्याबरोबरच आघाडीच्या उमेदवारांविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. या फेरीत प्रभाग ६ चे उमेदवार सौ. शाहीन तकीलदार यांच्या यांच्या प्रचारार्थ परिसरात नागरिकांशी संवाद साधला स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांना मोठ्या संख्येने होते.
