Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रविविध संघटनाच्या वतीने आजरा येथे संविधान दिन संपन्न.🛑व्यंकटराव हास्कूलमध्ये संविधान दिन संपन्न.

विविध संघटनाच्या वतीने आजरा येथे संविधान दिन संपन्न.🛑व्यंकटराव हास्कूलमध्ये संविधान दिन संपन्न.

🛑विविध संघटनाच्या वतीने आजरा येथे संविधान दिन संपन्न.
🛑व्यंकटराव हास्कूलमध्ये संविधान दिन संपन्न.

🛑विविध संघटनाच्या वतीने आजरा येथे संविधान दिन संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

आपले हक्क आणी अधिकार अबाधित ठेवण्यासाठी संविधान दिनाचे महत्व सर्वसामान्य लोकांच्यात पोहचवणे आवश्यक असलेचे मत संविधान दिना निमित्ताने व्यकटराव हायस्कूल आजरा येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात शशिकांत सावंत माझी विस्तार अधिकारी यांनी अध्यक्ष स्थानी असताना व्यक्त केले. सुरवातीला फोटो पूजन व उद्देशिकाचे वाचन करण्यात आले.
स्वागत व सुत्रसंचालन भिकाजी कांबळे यांनी केले.
यावेळी सावंत यांनी बोलताना संविधानांची सर्वाना आवश्यकता असून, अन्याय सहन करण्यासाठी सुध्दा मर्यादा असते, जेष्ठ नागरिक याचे वय साठ कि पासष्ट हा घोळ सुरू आहे. संविधानाचे महत्व व आजच्या दिवसासाठी
सर्व संघटनाचे पदाधिकारी एकत्र आल्याने समाधान व्यक्त केले. डाँ. उलास त्रिरत्ने यांनी डाँ. बाबासाहेब आंबेडकर यानी मानव मुक्ती साठी सर्व जाती धर्माचा विचार करून संविधानाची निर्मिती केली. त्याअगोदर समाज काय अवस्थेत होता हे समजून घेण्यासाठी संविधान व कलमाच्यावर चर्चा आवश्यक असलेचे सांगितले. काशिनाथ मोरे यानी सजीवसृष्टीला न्याय देण्याचे काम संविधानाने केले असून आरोग्य शिक्षण सर्वाना मोफत असताना, जाणीव पूर्वक रिक्त जागा ठेवून संविधानाची पायमल्ली होत असल्याचे सांगितले. यावेळी संदीप दाभिलकर, काँ. शांताराम पाटील,संतोष मासोळे, सुर्यकांत कांबळे, संजय घाटगे,समिर तकीलदार यानी मत व्यक्त केले.
यावेळी सुरेश दिवेकर, परसू कांबळे, विजय कांबळे, जालिंदर कांबळे, गिता कांबळे याच्या सह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थिती होते. आभार विश्वास कांबळे यांनी मानले.

🛑व्यंकटराव हास्कूलमध्ये संविधान दिन संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

व्यंकटराव शिक्षण संकुलामध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला संविधानाच्या पुस्तक प्रतीचे पूजन प्रशालेचे प्राचार्य श्री एम एम नागुर्डेकर , व्यंकटराव प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री आर.व्ही. देसाई व सर्व शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत करणेत आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री एस वाय भोये यांनी केले व संविधानाबद्दल श्री व्ही टी कांबळे यांनी आपल्या मनोगतातून सविस्तर मांडले. व सर्व विद्यार्थ्यांना आपल्या घरी संविधानाची एक प्रत असावी असे आवाहन केले. तसेच या संविधानाचे आपल्या जीवनातील महत्त्व तसेच संविधानाने संपूर्ण भारतातील जनतेला जात, पात, धर्म, पंथ विसरून आपण एक भारतीय आहोत याची जाणीव करून दिलेली आहे. म्हणूनच प्रदेशात आपण आपली प्रथम ओळख करून देताना आम्ही भारतीय आहोत असे अभिमानाने सांगतो. या संविधानाच्या विस्तृत अभ्यासपूर्ण लेखनासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेली अभ्यासपूर्ण मेहनत आपल्या विचारातून स्पष्ट केली. या संविधानामध्ये महिलांना दिलेले स्वातंत्र्य, अधिकार यामुळे महिला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्वतःला सिद्ध करण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत. त्यांच्या आजच्या या ज्ञानाचा देशाच्या प्रगतीसाठी निश्चित मदत होत आहे. आपले संविधान हे जगात आदर्शवत संविधान असल्याचे सांगितले.

 प्राचार्य  एम एम नागुर्डेकर यांनीही संविधानाबद्दल आपले विचार मांडले. या कार्यक्रमासाठी सौ एस ईलगे, श्रीम.एन.ए.मोरे , श्रीमत एस.टी. पाटील, सौ.व्ही.ए.वडवळेकर, सौ.ए.एस.गुरव उपस्थित होते. श्री पी.व्ही.पाटील यांनी आभार मानले.. कार्यक्रमाच्या शेवटी मुंबई येथील 26- 11 रोजीच्या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिक व कर्मचारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली..

आजरा हायस्कूल येथे संविधान दिन उत्साहात साजरा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.