वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यामार्फत ऊस तोडणी मजूर व महीलांची आरोग्य तपासणी व सॅनिटरी नॅपकीनचे वाटप.
आजरा.- प्रतिनिधी.
वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याकडे चालू हंगामात ऊस तोडणी करीता आलेल्या परजिल्ह्यातील महीला व मजूरांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जात आहे. त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून या महीला मंजूर व त्यांच्या मुलींसाठी कारखान्याने सॅनिटरी नॅपकीन स्वखर्चाने उपलब्ध केले आहेत. शुक्रवारी गजरगांव ता. आजरा येथे ऊस तोडणी मजूर व महीलांचे आरोग्य तपासणी करिता आरोग्य शिबीर आयोजित करून त्यामध्ये १२८ मजूरांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर मजूर महिलांना व त्यांच्या मुलींना सॅनिटरी नॅपकीन वाटपाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी कारखान्याचे संचालक अनिल फडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर जी गुरव, ग्रामसेवक अजितसिंह किल्लेदार, आरोग्य विभाग स्टाफ, शेती विभाग मुख्य लिपिक संदीप कांबळे व अन्य स्टाफ त्याचबरोबर ऊस तोडणी मजूर महीला उपस्थित होत्या.

