राईस मिल आजरा रस्त्यावर खड्ड्याचे व चिखलाचे साम्राज्य.- नगरपंचायतने तात्काळ दुरुस्ती करावी व रस्त्याचे खड्ड्यात भर टाकावी. आजरा शहर मनसेचा इशारा.
आजरा.- प्रतिनिधी.

आजऱ्यातील राईस मिल वरून रवळनाथ कॉलनी कडे जाणारा रस्ता या रस्त्यावर पाणी व चिखलाचे साम्राज्य झाले आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष यश सुतार यांनी आजरा नगरपंचायत प्रशासनाला विनंती केली आहे. राईस मिल, आजरा परिसरातील रस्त्यावर सुमारे पाच मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून नागरिकांचे प्राण धोक्यात आले आहेत. दररोज अपघाताचा धोका निर्माण होत आहे. तरी या ठिकाणी पाईपलाईन लिकेज् झाले असल्याचे समजते
निवडणुका असोत किंवा नसोत, नागरिकांची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. म्हणून प्रशासनाने हे खड्डे तात्काळ मुजवून सुरक्षित व्यवस्था करावी, ही नम्र विनंती असून
जर या तक्रारीकडे व विनंतीपूर्वक मागणीकडे तातडीने लक्ष दिलं नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याबाबत योग्य प्रकारे उत्तर देईल असली तरी या चिखलातील खड्ड्यात बसून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
याबाबतची माहिती
यश सुतार शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, आजरा यांनी सदर माहिती दिली आहे.
