आजऱ्याच्या नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत.- कमळ, घड्याळ, धनुष्यबाण, रेल्वे इंजिन चिन्ह. का? नाहीत.- निष्ठावंत कार्यकर्त्यांची खदखद.
आजरा.- प्रतिनिधी

आजरा नगरपंचायत निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार आघाडी करून आजरा नगरपंचायत निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत कमळ, धनुष्यबाण, घड्याळ, रेल्वे इंजिन, यामध्ये या पक्षाचे उमेदवार काही असू शकतील परंतु प्रत्यक्षात नगरपंचायत च्या माध्यमातून जनतेपर्यंत, घरोघरी निवडणूक चिन्ह म्हणून पोहोचले पाहिजे होते. या निवडणूक प्रवाहातून ही चिन्हे बाहेर आहेत. का? असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्याला पडला आहे.
पक्षाच्या एबी फॉर्मवर फक्त काँग्रेस चिन्ह- हात, शिवसेना उबाठा – चिन्ह मशाल, राष्ट्रवादी शरद पवार गट तुतारी ही चिन्ह आहेत. परंतु राज्यात सत्तेत असणारी पक्षांची चिन्ह मात्र आजरा नगरपंचायत निवडणुकीत डिजिटल फलकावर दिसत नाहीत.
मग काही आघाडीने आमचा खरा पक्ष आहे. असे म्हणणारे मंडळी व नेते यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सत्तेतील पक्षाचे चिन्ह एबी फॉर्म दिले नाहीत की स्थानिक नेते आघाडी करणाऱ्या नेत्यांनी मागणी केली नाही. खऱ्या अर्थाने या चिन्हांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला असली तरी या निवडणुकीतून ही चिन्ह बाहेर आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

चौकट. – अनेक निष्ठावंत उमेदवार कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या रणांगणातून माघार घ्यायला लावून काही प्रमाणात बंडखोरांना थांबवलं आहे. तरीही काही अपक्ष उमेदवार अजूनही निवडणूक रणांगणात आहेत. अनेकांना स्वीकृत सदस्य करून घेतो म्हणून काही नेत्यांनी शब्द दिले आहेत. अशी चर्चा आजरा शहरात आहे. त्यामुळे शब्द दिलेले उमेदवार कार्यकर्ते यांची संख्या अधिक आहे. मग स्वीकृत सदस्यांची संधी कोणाला मिळणार हे निकाल नंतर समजेलच – पण शब्द दिलेल सर्वांनाच स्वीकृत सदस्य ( नगरसेवक) मिळेलच याची शाश्वती दिसत नाही.

