ताराराणी आघाडीच्या उमेदवाराची प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शक्ती प्रदर्शन करत संपन्न.- दि. २३ पासून तिन्ही आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी – शिवसेना शिंदे गट पुरस्कृत ताराराणी आघाडीचे उमेदवार छाननी व माघारच्या पूर्वीच जाहीर करण्यात आले होते.
या आघाडीतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक चराटी आहेत. तर दुसरीकडे अन्याय निवारण समिती आघाडीत अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, भाजपचे जुने कार्यकर्ते पदाधिकारी या आघाडीत यांनी सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रद्धानंद ठाकूर यांची नगराध्यक्ष उमेदवारी जाहीर केली व या आघाडीचे आठ उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत.

तर आज दि.२२ रोजी
काँग्रेस, जयवंतराव शिंपी गट, शिवसेना ( उबाठा ) संभाजी पाटील, मुकुंददादा देसाई ( राष्ट्रवादी शरद पवार गट ) अशी आघाडी या आघाडीचे उमेदवार भगवा रक्षक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांची नगराध्यक्ष पदाची उमेदवार सह १५ उमेदवारांच्या आज घोषणा करण्यात आली.
यात काही आघाडीमध्ये तडजोडीच्या राजकारणात, व जागावाटपतील नाराजी पुढे येत आजरा नगरपंचायत मध्ये तीन आघाड्या झाल्या. यामध्ये ताराराणी विकास आघाडी यांनी चार दिवसापूर्वी आपले नगराध्यक्ष पदासह सर्व उमेदवार जाहीर करून प्रचाराचा मार्ग मोकळा केला होता.

आजरा शहरात प्रत्येक सतरा प्रभागात उमेदवारांचे डिजिटल फलक लावून प्रचाराला सुरुवात केली. आज दि. २२ रोजी काही प्रभागातील प्रचार कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले. आजरा शहरातील माजी सरपंच ज्येष्ठ नागरिक शिवाजी गुडुळकर यांच्या हस्ते पूजन व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक चराटी यांच्या हस्ते श्रीफळ देऊन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रभागातील उमेदवार, गाडीतील प्रमुख पदाधिकारी प्रभागातील मतदार, नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सद्यस्थितीत तीनही आघाडीचे उमेदवारांमध्ये ताराराणी आघाडीचे नगराध्यक्ष पद व एकूण १७ प्रभागात जाहीर केले आहेत. अन्याय निवारण समिती आघाडीने नगराध्यक्ष पद व नगरसेवक आठ उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत. तर आजरा परिवर्तन विकास आघाडीचे नगराध्यक्ष पद व १५ प्रभागात उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत. या तिन्ही आघाडीत कारण आम्ही विकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतली आहे. असे एकूण नगराध्यक्ष पदाचे सहा उमेदवार रिंगणात आहेत. यातील अन्याय निवारण समिती आघाडीला चिन्ह वाटप नंतर प्रचाराला सुरुवात होईल. काँग्रेस, शिवसेना शरद पवार गट यांची उमेदवारांची एबी फॉर्म असल्याने त्यांचे चिन्ह निश्चित झाल आहे. ताराराणी आघाडीने प्रचारात आघाडी घेतली असली तरी त्यांचे चिन्ह अजून निश्चित नाही. वेगवेगळ्या पक्षाची ही आघाडी असली तरी कोणताही एबी फॉर्म जोडलेले नसून चिन्ह वाटपानंतर जनतेपर्यंत चिन्ह पोहोचण्यासाठी प्रचार खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. यामध्ये अन्याय निवारण समिती आघाडीला देखील चिन्ह मिळाल्यानंतर प्रचार ला सुरुवात होईल.
