आजरा परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांची पत्रकार परिषदेत घोषणा.- आजरा नगरपंचायत मध्ये तिरंगी लढत.
आजरा – प्रतिनिधी.

आजरा नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत दोन आघाडीची घोषणा झाली होती. आज दि. २२ रोजी तिसऱ्या आजरा परिवर्तन विकास आघाडीची घोषणा झाली. यावेळी कॉम्रेड संपत देसाई, माजी उपनगराध्यक्ष आलम नाईकवाडे, सामाजिक कार्यकर्ते अमानुल्ला आगलावे, प्रभाकर कोरवी, शिवसेना उबाठा ता. प्रमुख युवराज पोवार यांनी आघाडीची ध्येय धोरणे याबाबत मनोगत व्यक्त करत उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन केले. स्वागत प्रास्ताविक व उमेदवारांच्या नावाची घोषणा माजी नगरसेवक अभिषेक शिंपी यांनी केली.

आजरा परिवर्तन विकास आघाडीची भूमिका.
लोकाभिमुख कारभार आणि आजरा शहराचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास….
आजरा- हुकुमशाही आणि मनमानी कारभाराला वैतागली सुज्ञ जनता या पंचवार्षिक निवडणुकीत आजरा परिवर्तन विकास आघाडीच्या मागे ठामपणे उभा राहील. याची आम्हाला खात्री आहे. जनतेच्या याचं विश्वासाच्या आधारावर लोकाभिमुख स्वच्छ, पारदर्शी कारभार आणि आजरा शहराचा सर्वांगीण विकास ही भूमिका घेऊन आम्ही या निवडणुकीत आजरा परिवर्तन विकास आघाडी म्हणून उतरलो आहोत. आजरा शहराची नगरपंचायत झाल्यानंतर इथल्या जनतेने ज्या विश्वासाने नगरपंचायतीची सत्ता सत्ताधारी आघाडीकडे सोपवली होती, त्या जनतेच्या विश्वासाला सत्ताधारी नेतृत्वाने हरताळ फासला आहे. मनमानी कारभार आणी बगलबच्च्यांचे हित हाच या मंडळींचा एकमेव अजेंडा राहिला आहे. म्हणूनच या निवडणुकीत आजरा शहराच्या विकासाचे नवे प्रारूप मांडून आम्ही मतदारांच्याकडे जाणार आहोत.

आजरा शहर कोकणचे प्रवेशद्वार. गोवा आणि कोकणात जाणारा पर्यटक याचं शहरातून जातो. स्वच्छ हवा, समृध्द निसर्ग आणि मुबलक पाणी असतानाही केवळ विकासाभिमुख राज्यकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे या शहराचा विकास रखडलेला आहे. ‘सुंदर आजरा… समृध्द आजरा’ हा आमचा अजेंडा असून विकासाचे नवे प्रारूप घेऊनच आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत. पिण्याचे स्वच्छ आणि शुध्द पाणी, स्वच्छ सुंदर रस्ते, जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा पार्क, स्त्रियांसाठी स्वच्छतागृहे यासह नवनवे उपक्रम राबवून जनहिताच्या कामावर आमचा भर राहणार आहे. आजरा शहराला मोठा सांस्कृतिक वारसा असून मृत्यंजयकार शिवाजीराव सावंत, राजा शिरगुप्पे सारखे मोठे साहित्यिक या शहराने घडवले आहेत. त्यांचा सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे काम आम्ही करणार आहोत.
स्वर्गीय अमृताकाका देसाई, स्व. काशीनाथअण्णा चराटी, बळीरामजी देसाई, वसंतराव देसाई, माधवराव देशपांडे, सिलेमान दिडबाग इथल्या अठरापगड जातीतल्या आणि विवध धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन त्यांच्यामध्ये एक बंधुभावाचे नाते तयार केले. तो वारसा पुढे घेऊन जाण्याचा विश्वास आजरा परिवर्तन विकास आघाडी म्हणून आम्ही देत आहे.
आजरा परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार यादी पुढीलप्रमाणे.
नगराध्यक्ष.- संजयभाऊ संभाजी सावंत. चिन्ह. ✋🏻हात
नगरसेवक पदाचे उमेदवार.
प्रभाग १) – सौ भैरवी राजेंद्र सावंत. – चिन्ह.- ✋🏻हात
प्रभाग २) – संभाजी दत्तात्रय पाटील. चिन्ह. – मशाल
प्रभाग ३) सुमैय्या अमित खेडेकर . चिन्ह – ✋🏻हात
प्रभाग ४) मुसासरफराज इस्माईल पटेल. – चिन्ह – ✋🏻हात

प्रभाग ५) जस्मिन मोहमद इरफान सय्यद. चिन्ह .- हात ✋🏻
प्रभाग ६ ) सौ साधना अमोल मुरुकटे. चिन्ह.- ✋🏻हात
प्रभाग. ७) श्रीमती कलाबाई शंकर कांबळे चिन्ह.-✋🏻 हात
प्रभाग. -८) असिफ मुनाफ सोनेखान – चिन्ह. ✋🏻हात
प्रभाग ९) रेश्मा नौशाद बुडेडखान. चिन्ह.- हात
प्रभाग १०) निसार सबदारअली लाडजी. चिन्ह. ✋🏻 हात
प्रभाग ११ ) सौ आरती दिपक हरणे. चिन्ह.- ✋🏻 हात
प्रभाग १२) समीर विश्वनाथ गुंजटी. चिन्ह.-✋🏻 हात
प्रभाग १४ ) अभिषेक जयवंत शिंपी. चिन्ह. -✋🏻 हात
प्रभाग १६) सौ. मिनाक्षी संतोष पुजारी. चिन्ह.- मशाल
प्रभाग १७) सौ. सरिता अमोल गावडे. चिन्ह.- तुतारी
असे नगरसेवक पदासाठी या आघाडीचे १५ उमेदवार रिंगणात आहेत. तर नगराध्यक्ष पदासाठी एक…
